Image by clogwog via Flickr
सांग साजणी मनातले तू माझ्यासंगे येशिल ना
सचैल न्हाल्या वेली अवघ्या सख्या बिलगतिल सुखावुनी
तूही संपविण्यास दुरावा हाती हाता देशिल ना
कधी हसू कधि शांत बसू अन् कधी गुणगुणू बालकवी
हृदयी गुंजन तव नामाचे ! वेध तयाचा घेशिल ना
निमित्त केवळ जलधारांचे; गगनाची धरणीस मिठी
काय चिंतिसी - 'आपल्यातही असेच काही होइल ' ना ?
सरींमागुती लपती छपती उन्हे पिऊया जोडीने
हवेत ओल्या कवेत माझ्यासवे शहारुन जाशिल ना
जन्मच आहे श्रावण अवघा कळेल का हे तुला कधी
उन्हे कोणती पाउस कुठला अर्थ पारखुन घेशिल ना
इ-मेल फॉरवर्ड - आभार - कवि - लेखक
mast
उत्तर द्याहटवा