Image via Wikipedia
जीवनाचा डाव अजुनि मांडतो आहेजिंकू पुन्हा हार म्हणुनि मानतो आहे
भूतकाळाच्या चुका विसरून आता
हास्य करुनि आसवांना मारतो आहे
रात्र काळोखी इथे पुरणार मी
वाट पाहत त्या उषेची जागतो आहे
शल्य बाहेरी जगाची मी झुगारून
शांत संसारात माझ्या नांदतो आहे
जगाने आता बनविले कोडगे,
प्रेत पूर्वीच्या 'अनु'चे जाळतो आहे..
चेसचा मी डाव अजुनि मांडतो आहे
मीच खेळोनि चुकीचे भांडतो आहे
'कासवाचे' खोकडे विसरून पुन्हा
जागुनि मी डास आता मारतो आहे
भात इतकुसा कसा पुरणार त्याला
संपवून तो वाट त्याची पाहतो आहे
'सात फेरे' ची मजा 'हिस्टरी'त नाही
हातुनि रीमोट मीपण हिसकतो आहे
टॉम आणिक जेरीला त्या पाहताना
गॅसवरती दूध 'राधा' जाळते आहे..
इ-मेल फॉरवर्ड - आभार - कवि - लेखक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा