Image by Bern@t via Flickr
असेही काही क्षण आयुष्यात असतातमनाच्या आकाशात लुकलुकत असतात
अवखळ क्षण, खळखळाट भरलेले
मनाला भिडलेला चंचलपणा
मौज-मस्तीचा उधाण वारा
दिशाहीन कुठेही वाहणारा
श्वास रोखणारे सुखही असते
गुदमरून, हृदयी कोंडलेले
भार पेलवत नाही सुखाचा
म्हणून नयन कडांतून ओसंडलेले.
क्षण असतात सुख-दु:ख एकोप्याचे
दु:खातून सुख शोधण्याचे
सुखातील दु:ख जाणण्याचे
सुख-दु:ख आनंदण्याचे.
इ-मेल फॉरवर्ड - आभार - कवि - लेखक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा