Image via Wikipedia
अक्षयची आई : (कळत नकळत)
फुटक्या तुझ्या नशिबानं, बा तुझा गेला
मुडदा बशिवला तुझा, नाव घे सांगतोय मला
हर्षवर्धन: (अवघाची संसार)
एक रुसे-फुगे , दुसरी blackmail करी
सांभाळून मला घेणारी, आसावरीच बरी
अंतरा : (अवघाची संसार)
मुखडा बदलला गीत विरले अंतरा ही हरवला
निगराणीने नरेशांच्या मोगरा हा बहरला
(नरेश हे नाव चुकल असेल तर कृपया दुरुस्त करा)
विष्णु (असंभव) काहीतरी पुटपुटत होता. आदेश भावजीनी त्याला विचारले,
आजोबानी "धपाटा घालीन" असे दरडावले पण तो काही केल्या बोलेना.
शेवटी तानिश्काच्या मदतीने त्याच्या मनातील आवाज amplify केला गेला ....*
विष्णु : (असंभव)
आलं अनेकदा मनात, लग्न पहाव करून
दोन म्हातारे सांभाळताना, वय गेलं सरून
विष्णु : (असंभव)
गंडांतर येतात भुतं दिसतात, सरलं वाड्याच वैभव
माझं आता लग्न होण .... असंभव ! असंभव !!
मधुरा(कळत नकळत) एक होती चिऊ एक होती काऊ
गौरव रावांच नाव घेते , डोक नका खाऊ....
मधुरा(कळत नकळत) अभ्यंकर इंडस्ट्रीस ला नमस्कार करते मी वाकून ........
रोहित खानविलकर चे नाव घेते मी पाच गाडी राखून.........
भैरवी (वहिनिसाहेब) माझ्या हसण्यापेक्षा माझे रड्णेच
या जगाला अवड्ते
म्हणुनच त्या जगासाठी
माझे रड्णेसुध्दा मला आवड्ते......
हर्षवर्धन (अवघाची संसार) :
स्वैराचाराच्या आड, येई लग्नाची बेडी
मुक्त होईन ठरवून, आसावरीला वेडी
आसावरी (अवघाची संसार) :
रोजच तमाशा, रोज नाटक, रोज फार्स
काय म्हणू 'ह्यांना', हर्ष की harsh ?
......... इ-मेल फॉरवर्ड - आभार - कवि - लेखक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा