सख्खे शेजारी - मराठी कविता

Twin Freaks album coverImage via Wikipedia

माझ्यातली दोन मनं
अगदी सख्खे शेजारी
एक वेडं, तर एक शहाणं!
वेड्याच्या हाती तलवार
तर शहाण्याच्या ढाल!

वेडं वाट चुकत असतं
नको तिथं धावत सुटतं
शहाणं वाट शोधून काढतं
योग्य जागी नेऊन सोडतं!

वेडं सतत घाईतच असतं
संयमाशी पटतच नसतं
शहणं मात्र शांत असतं
धीराचं फळ त्याला हवं असतं!

वेडं मन हट्टाला पेटतं
धगधगत्या श्वासांनी काळीज पेटवतं
शहाणं त्याला जवळ घेतं
समजुतीच ओलाव्याने त्याला शांत करतं!

इ-मेल फॉरवर्ड - आभार - कवि - लेखक
Reblog this post [with Zemanta]

टिप्पण्या

  1. Kharach....Khoop Chhan, agadi Chhan varnan kela aahe mananche. khoop aavadali kavita....

    उत्तर द्याहटवा
  2. khupach surekh ahe apal collection...malapan apalya collectionmadhe bhar ghalavishi vatate..kahi kavita, charolya mepan lihilya ahet...kay karave lagel jar upload karaych aseltar? pls mala kalava.

    उत्तर द्याहटवा
  3. @सारिका, गितांजली,
    आपणांस कविता आवडली - छान. असेच भेट देत रहा!

    @गितांजली,
    आपण आपल्या कविता - [टेक्स्ट] marathimitra@gmail.com वर मेल करा. आम्ही त्या मी मराठीवर प्रकाशित करु!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा