Image via Wikipedia
मनासारखे देवा आता दान देआयुष्याला अर्थाचे परिमाण दे
हातावरती नसोत रेषा असोत रेषा
नशीब माझे लिहायचे सामान दे
किती वेदना सोसायाच्या लाजिरवाण्या?
शेवट आला आता तरी सन्मान दे
नीरस वाटे चाकोरीचा रुळला चकवा
नवीन वाटा घडवायाचे आव्हान दे
तुझाच केला धावा गेली कितीक वर्षे
जगन्नियंत्या आम्हा तुझे पतित्राण दे
दिलास सागर, दिलेस खारे पाणी
सागराला आता थोडी तहान दे..!
......................... इ-मेल फॉरवर्ड - आभार - कवि - लेखक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा