Image via Wikipedia
काय सांगू मी ऑरकुटची दशा...इथे मैत्री होते कशा बशा...
खोटी असते इथे खरी मैत्रीची आशा...
काही दिवसात हाती लागते ती फ़क्त निराशा...
वेळेवर अवलंबून असते इथे मैत्री...
आंबट असतात इथे मैत्रीचे संत्री..
मिळतील इथे खोट्या बोलाचे मंत्री...
मैत्री टिकेल का ह्याची देता येत नाही खात्री..
गोड मैत्री असते ती फ़क्त आपल्या मनात...
इथे मैत्री तुटते फ़क्त काही क्षणात...
शब्द नाही बसत इथे आपल्या ह्र्युदयाचा खनात...
आपले पैसे वाया जातात मोबईल बिलात...
चट्टिंग करण्यात विसरतो आपण तहान आणि भूक..
बिन भावनांचे पाठवत असतो आपण खोटे स्क्रैपबुक..
टेस्तिमोनिअल ही असते आपल्या मित्रांची चुक..
अनोलखी व्यक्ति कधीच समझू शकत नाही बिनचुक..
माहित नसते काय असतो एक खरा मित्र....
वागतात सगळे एकमेकांशी एकदम विचित्र..
आपल्या बद्दल खोटे रंगवतात ते स्वभावाचे चित्र..
खर आयुष्यात वेगलेच असते त्या माणसाचे जीवन सूत्र..
फालतू असतात इकडचे कम्युनिटी...
जास्त मेम्बर्स बनवण्याची असते त्यांची नीति...
पच-पचित कविता आणि विनोद वाचून वाटते खुपच भीती..
असे वाटे की गेल्या जन्मी मी पाप केले तरी किती...
करतात इथे सुंदर शब्दांची तोड़-मोड़..
बोलताना नसते इथे विनोदी हास्याची जोड़..
बिन-भावनाचे शब्द वाटतात गोड-गोड..
विनाकारण आपण का करतो आपल्या मनाशी तड-जोड़..
अपलोड केलेले फोटो असतात खोटे..
मुली सुंदर पण मनाने असतात खुपच छोटे..
विसरलो आपण मस्त मैदानी खेळ मोठ मोठे..
गोड नसून फ़क्त शब्द असतात इथे काटे...
चट्टिंग करून विसरलो आपण मस्त झोप..
हेच माहीत नाही काय असते सुंदर झाडांची रोप..
कृत्रिम भावनांचा माजला आहे इथे मोठा क्रोप..
आपली मैत्रीची भाषाच पावली आहे इथे लोप..
मनाला मन जुळत नाही इथे थेट...
निरागस असते चट्टिंग मित्रांची बाहेर भेट...
दुखात कोणीही घेत नाही मिठेत...
बेचव गोड गोड बोलतात इथे सगळे थेट...
ऑफ़लाइन असलो की कोणीही काढत नाही आठवण...
नविन मित्र बनवण्यात तय्यार असतात प्रतेक जन...
इथे फ़क्त वाया जाते ती आपली प्रथिष्टा, पैसा आणि धन..
इथे मित्र असून सुध्धा एकटे असते आपले निरागस मन...
वर्चुअल फ्रेंडशिप करने हयात कसला आहे तर्क..
तासंतास असतो आपण कंप्यूटरवर गर्ग...
विसरलो आपण खरे नाते आणि निसर्ग...
रक्ताचे नाते देखिल असतात खरे स्वर्ग...
भेटायला बोलावून देतात इथे धोके...
अपहरण करून मांगतात करोडेचे खोके...
मिळतिल इथे तुम्हाला धोक्यांचे झोके..
इथे सगलेच असतात डोळे झाकून दूध पिणारे बोके...
इथे प्रतेक्क मुली असतात हरामखोर..
मुलाना सतावनारे असतात ते चोर..
मुले सुद्धा करतात मुलीं मध्ये अति शिरझोर...
मुले तर असतात चोरावर शाहने मोर..
चट्टिंगची लागते आपल्याला वाईट सवय...
चटके खात बसतो आपला हा निरागस ह्र्युदय..
चट्टिंग मधे वाया घालवू नका आपले तरुण वय...
चांगले शिक्षण घेउन मिळवा आयुष्यावर विजय..
ऑरकुट जास्त बोरिंग झाला आहे पूर्वी पेक्षा...
ह्याचा कडून जास्त ठेवू नका तुम्ही काही अपेक्षा..
खुपच गुंता-गुंतिचा आहे इथे मैत्रीचा नक्षा..
अनोलखी व्यक्ति पासून देव करो तुमची रक्षा...
बोललो मी तुम्हाला ऑरकुट बद्दल खुपच तोडून-मोडून...
फ़क्त निरागस प्रेमाची अपेक्षा होती ऑरकुट मित्रांकडून...
कही चुकल असेल माझ तर माफ़ी मांगतो मी हाथ जोडून..
तुमच्या कडून काही न घेता चाललो मी ऑरकुट सोडून...!
.............................................. [इ-मेल फौरवर्ड ] प्रणय परब
absolutely right!!!! i agree
उत्तर द्याहटवा