Image via Wikipedia
तुझाच तर मी आहे चाकर आयुष्याहवा तसा कर माझा वापर आयुष्या!...
ज्या रस्त्याने चालत जातो आहे मी
प्रवास आहे माझा खडतर आयुष्या...
सरळ चालणे अवघड जाते का इतके?
रोजच बसते मजला ठोकर आयुष्या...
तुझी वादळे झेलत आलो इथवर मी
ध्वस्त होउनी भटकू कुठवर आयुष्या?...
मूल्ये, तत्त्वे, निष्ठा ठेवू बाजूला;
मौज करू ये चल घटाकाभर आयुष्या!...
दुसऱ्यासाठी वेळच नसतो कुणासही
माझी नसते मलाही खबर आयुष्या...
बेफिकिर मी झालो आहे इतका की
तुला सोडले मी वाऱ्यावर आयुष्या...
मला जगू दे 'माझे' जगणे, नको 'तुझे'
(भीक नको पण कुत्रे आवर आयुष्या...)
का जगशी तू 'अजब' मला हा प्रश्न तुझा
मी प्रश्नाने तुझ्या निरुत्तर आयुष्या...
......................... अजब
[इमेल - फौरवर्ड]
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा