Image via Wikipedia
सोबतीला सूर नाही
दाटले डोळ्यांत अश्रू
पण आसवांचा पूर नाही
हाच आहे तो किनारा
येथेच होती भेट झाली
अन् संपली जेथे कहाणी
तोही पत्थर दूर नाही
तू जिथे अ सशील तेथे
पौर्णिमेचा चंद्र नां दो
आंधळ्या माझ्या नभा ला
चांदण्यांचा नूर नाही
ही मेजवानी चालली
माझाच केला घात त्यांची
पंगतीला या बसावे
मी एव्हढा मजबूर नाही
रात्र त्यांची झिंगलेली
पण आत्मे अस्थिर झाले
शांत आहे झोप माझी
अंतरी काहूर नाही.....
....................... दिनेश
Dear Dinesh,
उत्तर द्याहटवाएकटेच शब्द माझे ही कविता आवडली.
Thanks
Dear Dinesh,
उत्तर द्याहटवाYour poem is very nice..Like it very much.
Wel done.
Thanks.
apratim
उत्तर द्याहटवा@Anonymous
उत्तर द्याहटवामी मराठीला भेट दिल्या बद्दल अनेक आभार!