Image by Bruce McKay via Flickr
जपण्यासाठी माळ कशाला?मनाला तुझ्या जपत जा
विकाराच्या जनजालातून
हळुहळू लपत जा..
सजण्यासाठी फूल कशाला
तूझा तूच फुलत जा
देवळातल्या गाभा-यात
पाषाणाला घडवत् जा
रंग नको ढंग नको
प्राजक्ताची फुले वाहा
इंद्रधनुच्या रंगताला
तूच एक रंग राहा ...!
....................................... ज्योती
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा