Image by dragon762w via Flickr
आकाश व्यापायची गर्दी करतं जेव्हां दाटुन येतात सांजमेघ...तेव्हा वाटतं....
त्यांच्या या जलभारल्या अस्तित्वापेक्षा त्यांचं रिक्त अस्तित्वच सुंदर... मनाला चिंब करणारं!
भरतीची समुद्रधुन जपत...
लाटांच खळालोळ कवेत घेणार्या अवखळ अस्तित्वापेक्षा
किनार्याचं अस्तित्व अधिक रमणीय
माणसालाही असं दुभंगुन बरसता आलं पाहिजे...
खळाळत्या रिक्तपणात जगता आलं पाहिजे...
मग अस्तित्वाचे संदर्भ शोधावे लागत नाहीत
स्वप्नांच्या काजव्यांना पंख जोडावे लागत नाहीत...!
गिरीश कुलकर्णी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा