Image by Jay Woodworth via Flickr
नसे तुझा देह चंदनाचा, न हे तुझे ओठ केशराचेपुसून जातात संधिकाली कधी कधी रंग मेकपाचे!
असाच प्रत्येक आरतीतून आणला हा करून चोरी
म्हणून आता तयार झाले घरातले ढीग कापराचे!
करून संसार मी तुझा फक्त भारवाहू हमाल झालो
वहाण माझी अशीच फाटे करून फेरे किती घराचे !
निमूट ऐकून घ्यावयाला कुणीतरी लाडका हवा ना?
रडून ती दाखवी स्वतः का असून काळीज पत्थराचे!
तुझ्यासवे बोलतो तरी मी, तिला कधी भेटलोच नाही
कबूल ह्या प्रेमिकास आता तुझ्यात अस्तित्व सायराचे
कधी कधी मांजरेच काही चढून तोऱ्यात जात होती
घरात झालेच माणसांना उगाच आभास वानराचे!
तुझ्या नि माझ्या झटापटींच्या घडून गेल्या कितीक फेऱ्या
हवीहवीशी तुझी चढाई, असे सदा बोल अंतराचे
[आधारित- कधी तुझा देह चंदनाचा, कधी तुझे ओठ केशराचे- चित्त]
.................. कारकून
[इमेल - फौरवर्ड]
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा