सांग सख्या माझ्या सवे मैत्री तू करशिल का? [Marathi Kavita]

A KIMONO FRIENDSHIP in OLD JAPANImage by Okinawa Soba via Flickr


सांग सख्या माझ्या सवे मैत्री तू करशिल का?
माझ्या सवे अंगणी खेलात तू रमशील का?
झाडावरच्या झुल्यावरी माझ्या सवे झुलाशील का?
खेलातला डाव मोडून माझ्यावरी रुसशील का?
सांग सख्या माझ्या सवे मैत्री तू करशिलका?



अंधारात रात्रीचा चंद्र तू होशील का?
अडकलता पाउले हात तुझा देशील का?
चुकता माझी पाउले राग तू कराशिला का?
सांग सख्या माझ्या सवे मैत्री तू करशिल का?

आली असता संकटे झेलुनी तू घेशील का?
काटेरी रस्त्यावर साथ माझी देशील का?
लापविता दुःख मी तास माझा घेशील का?
सांग सख्या माझ्या सवे मैत्री तू करशिल का?


माझ्या सवे मनामोकल्या गुजगोष्टी करशील का?
समजुन माझ्या अडचणी सहानुभूति देशील का?
येता वाईट विचार मनी नवी उमेद होशील का?
सांग सख्या माझ्या सवे मैत्री तू करशिलका?

देशील माला प्रेम अणि माझे प्रेम घेशील का?
कही क्षण जीवनात आनंदाचे देशील का?
ठेवशील मला मनी अणि आठवणीत राहशील का?
सांग सख्या माझ्या सवे मैत्री तू करशिल का......?

............................ इमेल फौरवर्ड.

Reblog this post [with Zemanta]

टिप्पण्या