Image via Wikipedia
आताच उठून आलो आहे
गालावरच्या पावसाला एक
वाट करून आलो आहे
निळ्याशार पाण्यात मी
एकच बिंब पाहिले होते
वळून जेव्हा पाहिले तेव्हा
फक्त शब्दच उरले होते
याच किनारी बसून आपण
एक संध्याकाळ रंगवली होती
क्षितिजाला तेव्हा मी
हळूच हुलकावणी दिली होती
एकच साथ हवी होती
सोबत तुझ्या जगण्याची
हातामध्ये हात घेऊन
मॄगजळ पाहण्याची
किनारावर आजही मी
शांत उभा आहे
ओढून मला घेशील
याची वाट पाहत आहे
'आता माझे फक्त, एकच म्हणणे आहे
कधीही मला तू पुन्हा भेटू नकोस'
आता निदान थांबलो आहे
तेव्हा मी थांबणार नाही
माझे जीवन तेव्हा मी
माझ्या हाती ठेवणार नाही
म्हणूनच,
वादळाच्या कुशीतून मी
आताच उठून आलो आहे
गालावरच्या पावसाला एक
वाट करून आलो आहे"
continue...............
---संदीप उभळकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा