Image by whitecat singapore (AWAY) via Flickr
पक्ष्यांची शाळा भरली
संध्याकाळ बासरीने गुणगुणली
मला ती येण्याची चाहूल लागली
पाणी बेभान थिरकले
डोंगर संधीप्रकाशाने उजळले
दिवसाची घालमेल थबकली
मला ती येण्याची चाहूल लागली
सृष्टी चैतन्यात चिमुकली झाली
अंबरात सांज ऊतू गेली
पायवाटांत ओढ भिरभिरली
मला ती येण्याची चाहूल लागली
मेघ रेशमी गारव्याच्या अंथरुणात उतरले
डोळे संध्येच्या पंखांनी झाकले
अरुणाने रात्रीला हाक दिली
मला ती येण्याची चाहूल लागली
- प्रशांत सागवेकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा