Image by Getty Images via Daylife
संगाती माझ्या आली ती
ओळखसुद्धा नसतानाही
सोबतीण माझी झाली ती...
मी चालत होतो
तशी तीही चालत होती
मी थांबत होतो
तशी तीही थांबत होती...
जणु काही माझी
ती मैत्रीणच झाली
मात्र संध्याकाळ होताच
ती हळुच निसटून जाई...
रोज तिच्या भेटीचा
आनंद मिळतो मला
येता न जाता तिचाच
आधार असतो मला...
ती म्हणजे माझी
सावली आहे
तीची मला आयुष्यभर
साथ आहे!
.................................. अभिजित पागडे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा