चारोळ्या...[Marathi Charolya]

Impact from a water drop causes an upward &quo...Image via Wikipedia

[मुलाच्या मनातील विचार मांड्ण्याचा प्रयत्न....]
नाही गं वेडे.....चुकीचा समज आहे हा
जवळून जर पाहीलंस तर अस्तित्वाचा खेळ आहे हा
डोंगर असो मग.. अश्रुंचे गर स्वप्नांचे
चिंब माझ्या वर्षावाने..डोंगरही फुलवतील त्यातूनही झरे
आज उद्याच्या खेळामध्ये..भविष्यफुले परी उमलतील
विझवलेल्या डोळ्यांचे पाणी..शतपटींनी अंकुर रुजवतील
असेलच जर विश्वास अजूनही..वाट आहे काही क्षणांची
अजून काहीच थेंब थांब..येतोच आहे मी तिथे
तुझ्यामाझ्यातील अंकुराचे, हेच तर राणी रुजणे..
हेच राणी रुजणे



ती
ती अशी आली जीवनात की
डोळे माझे बोलके झाले
तिने हसून डोळे झाकले आणि
आज त्या सूर्यालाही बुडवणे कठीण झाले

क्षुद्र
आज मज आकाश भासे क्षुद्र
सारा आसमंत परी खिशातच माझ्या बंद
त्या तिथल्या ग्रहावरती भेटलाय एक सोबती
माझे सारे उरले क्षण आता त्याच्याच सोबती
....... आता त्याच्याच सोबती

--संदिप उभळ्कर

Reblog this post [with Zemanta]

टिप्पण्या

  1. पहिला पाऊस पहिली आठवण, पहिलं घरटं पहिलं अंगण
    पहिली माती पहिला गंध, पहिलं आभाळ पहिलं रान
    पहिल्या झोळीत पहिलच पान, पहिल्या सरीचा पहिलाच थेंब
    आपणासर्वांना वर्षा ऋतुच्या आगमनाच्या हार्दिकशुभेच्छा !!!

    उत्तर द्याहटवा
  2. पहिला पाऊस पहिली आठवण, पहिलं घरटं पहिलं अंगण
    पहिली माती पहिला गंध, पहिलं आभाळ पहिलं रान
    पहिल्या झोळीत पहिलच पान, पहिल्या सरीचा पहिलाच थेंब
    आपणासर्वांना वर्षा ऋतुच्या आगमनाच्या हार्दिकशुभेच्छा !!!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा