Image via Wikipedia
१. सुकलेले पानमी मात्र तुझ्या जीवनात
एक सुकलेले पान आहे
शिशिराच्या भर पावसाततिथे
माझे म्हणणे शून्य आहे
२. हर्ष
कळीचे फुलणे नि फुलपाखराचे येणे
टाचणी लावून जसे आभाळ ओतून घेणे
कसे बरे थांबतील मग हर्षाचे ते धुलीकण
पावसाच्या सरीमधले तुझे माझे मुके क्षण
३. भावना
मुक्या भावनांना तेव्हा शब्दांची गरज नव्हती
मनातल्या समुद्राला थांगपत्त्याची गरज नव्हती
चांदण्यांच्या ओहोटीतही शब्दचंद्र अपूर्ण होता
निदान तेव्हा निमित्ताला कारणांची गरज नव्हती
-संदिप उभळ्कर
chan ! fakta thoda sanskar hava shabdawar.
उत्तर द्याहटवा