एक नवा सुर मिळाला
रातराणीच्या फुलांना
आज नवा गंध मिळाला...
तुझ्या आज असण्याने
मन माझे धुंद आहे
याच धुंदिचा आनंद
अंगणात मंद आहे
"शब्दांमध्ये व्यक्त करणे
मला निदान शक्य नाही
भावनांच्या गुंतागुंतीत
तुला शोधणे शक्य नाही"
वसंत होता श्वासही होता
पण तेव्हा तू नव्हता
फरक आता इतकाच आहे
माझ्या मनी तू आहेस
आता प्रत्येक पावसात मला
फक्त एकच गोष्ट हवी
कुशीत मला ओढून घेशील
साथ इतकी तुझी हवी
आता माझ्या प्रत्येक गोष्टीत
एका सुखाचा भास असतो
भासाच्या त्या प्रत्येक क्षणात
तुझ्या असण्याचा नाद असतो
एकच आता मला तुला
सांगावेसे वाटते
तुझ्या हरएक दुःखात तू
मला ओढून घे
काठावरतीच आहे अजून
हळूच मला कुशीत घे
...............................संदिप उभळ्कर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा