आठवण ...

see filenameImage via Wikipediaतुझी आठवण आली ना की मला माझाच राग येतो,
संपले ना सर्व तुझ्याकडुन, मग असा का त्रास देतो?
नको त्या खोट्या शपथा, नको त्या सुखद आठवणी,
आठवुन सर्व काय करु? मग डोळ्यांत येते पाणी...

आठवणींनी पाणावलेल्या डोळ्यांत, तुला ईतरांपासुन लपवु कसे?
भरभरुन वाहणा-या अश्रुंना थोपवुन, खोटे हासु आणायचे तरी कसे?

ते अश्रु लपविण्यांच्या प्रयत्नांत, मग मी मलाच दोष देत राहते
आणि या खोट्या प्रयत्नांत, तुला आणखीनच आठवत राहते!

.................................. संचिता
Reblog this post [with Zemanta]

टिप्पण्या