जेंव्हा मी एकटा पडेन, तेंव्हा तु मला सोबत करशील ना?
चालताना पाय मझे डळमळतील, तेंव्हा आधाराला उभी राहशील ना?
आयुष्याचा रस्ता खुप खडतर असेल, तेंव्हा तु मला साथ करशील ना?
जेंव्हा हे हृदय साद घालील, तेंव्हा तु मला एकशील ना?
जेंव्हा जेंव्हा तुटतील, आझी स्वप्नं तु विणुन देशील ना?
जेंव्हा कधी माझ्याकडुन चुक होईल, मला माफ तु करशील ना?
जेंव्हा डोळे माझे अश्रुंनी डबडबले असतील, मला तुझ्या उबदार मिठीत घेशील ना?
आयुष्यात खुप दु:खे असतील, थोडी तु वाटुन घेशील ना?
माझ्या नयनी अश्रु वाहतील, नाजुक हातांनी तु पुसशील ना?
काळाच्या ओघात तरुणपण वाहुन जाईल, आता एवधंच प्रेम तेंव्हाही करशील ना?
घे तु ह्र्दयातुन शपथ, शेवटपर्यंत तु जवळ राहशील ना?
Email: niteensalvee[at]gmail.com
Mob: ९८९२०१९९०२
nice 1...
उत्तर द्याहटवाkhup chhan aahe
jevha.... just imagine