दिसं डोईवर आला
किती खेळशी विठ्ठला?
खुप घातल्या फुगड्या
बास झाल्या आता झिम्मा !!
आता जा की रे मंदिरा
भक्त देती तुला हाका...
दिसं डोईवर आला
किती खेळशी विठ्ठला?
खुप खेळलो मी जने
तुझा थकला विठ्ठल,
तुझ्या कुशीत घे मला
दिसं डोईवर आला ..
खुप घातल्या फुगड्या
बास झाल्या आता झिम्मा,
जरा थोपट गं मला ..
दिसं डोईवर आला
........ चक्रवर्ती !
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा