एके दिवशी स्वप्नामध्ये संत ज्ञानेश्वर आले |
करुनी, करावी गंमत म्हणुन प्रश्न मी त्यांना विचारले||
मी म्हणालो - ज्ञानदेवा, तुमची फार मजा होती |
मांडे भाजण्यासाठी चक्क तुम्ही तुमची पाठ तापवली होती ||
मलाही जरा सांगाल का? पाठ कशी तापते|
कारण गॅसच्या रांगेत उभा राहुन आमची पाठ दुखते ||
हे तरी तुम्हाला सांगावच लागेल, रेडा बोलला कसा |
चार वेद आणि शास्त्र-वेद पुराण, नेमका शिकला कसा ||
कारण माणुसरुपी रेडे, आहेत खुप इथे |
खोटं बोलुन - स्वार्थ साधुन, संधी साधतात जिथे तिथे ||
ज्ञानदेवा, निदान सांगा मला हे तरी |
की गेलात कसे आपण चालत्या भिंतीवरी||
कारण रेल्वे आणि वाहनं चालत नाहीत नीट इथे|
आणि आमचं नशीब एवढं वाईट की, सरकार ही निट चालत नाही तिथे ||
तुमचं ऐकुन आम्ही रोज डोकं खाजऊ|
एथे न चालणा-या सा-या वस्तु, रोज आम्ही चालवु ||
माझे प्रश्न एकुन खरंच ज्ञानदेव हसले |
अम्रुतापरी एक एक शब्द , माझ्याकडे पाहुन बोलले ||
तो काळ असा होता की काहीच नव्हतं कमी|
अजुनही तोच काळ आहे, बदलुन गेलात तुम्ही ||
असावा विश्वास गुरुवरी, आणि भिस्त असावी कर्मावरी |
कलयुगाचे अवतार आहेत, बाबा निरंकारी ||
निरंकारी बाबांनी बोलतं केलयं, लाखो करोडो रेड्यांला |
सद्गुगुरु क्रुपे गुढ समजले, "प्रसाद सकट" या वेड्याला ||
....................... प्रसाद सुखदेव सकट
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा