निबंद - पावूस !

Hoganackkal boysImage by Felix Francis via Flickr

पावूस हा माजा आतिशयच आवडीचा रुतु आहे. पावूसामुळेच शेतात आंबेमोर भार व कणकेचे पिठ पिकते म्हणुनच आपण सगळे जेवू शकतो. "रिमजिम पडती श्रावण गारा" हे गाणे अतिशय रोमहर्षक आहे. आमचा रेडिओ बिघडला आहे त्यामुळे नीट ऐकू नाही आले तरीही आतिशयच आवडले.

पाउसाची सुरुवात रोमहर्षक असते. आधी कडाक्याचा उन्हाळा पडतो.
पेपरमर्हल्या व्रुतपत्रात बातम्या येउ लागतात. "उन्हाळा कमी होता की काय आता पावसाने मारलेली आहे" अशी नेमी बातमी असते.

( .. दडी हे लिहायचे राहिले - ते कंसात लिहिले आहे.)

भारता पाउस अंदमान येथे बनतो. तो वळत वळत केरळ गावात आणि तिथुन वळत वळत पुणे शहरात येतो. म्हणुनचा त्याला वळीव म्हणतात किंवा काहीजण वळवाचा पाउस ही म्हणतात. (आम्ही समोरचा गोगटे काकाना त्यांच्यासमोर 'काका' आणि ईतर काळी 'तात्या विनचु म्हणतो तसेच दोन सन्मानार्थी शबद आहेत')

काल पुण्याच्या शहरात पाउस पडला. पुणे हे प्राचीन प्रेकशणीय शहर आहे. तिथे शिंदे छ्त्री, शनिवारवाडा, सिटी प्राईड, पर्वती, काकडे मौल अशी पर्यटन स्थळे आहे. ह्यातला काही ठीकाणी घरचे लोक मला रविवारी पर्यटनाला
नेतात.
काल पावसाबरोबर गाराही पडल्या. गोगटे काकानी त्या जमवुन माठात टाकल्या. ते कुठलिही फुकट गोशट वाया घालवत नाहीत. अंत्या आतिशय बावळट आहे. तो बाबांचे हेलमेट घालुन गारा वेचायला आला होता.
मग मीही छतरी घेऊन गेलो. छतरी उलटी करुन गारा वेचल्याने ती फाटली. असा हा रोमहर्शक रुतु मला आतिशयच आवडतो.

- आयशौट उरफ राफा ( सहावी ड )

[ मूळ लिखान - राहुल फाटक यांचे आहे ]



Zemanta Pixie

टिप्पण्या

  1. गुरु,

    तुम्हाला हे लिखाण कसे मिळाले ?

    हे संक्षिप्त version आहे. नंतर अधिक थोडे लिहीले होते ते इथे वाचायला मिळेल :
    http://rahulphatak.blogspot.com/2007/05/blog-post_24.html

    ह्यापुढे (तुम्हाला माहित असेल तर) मूळ लिखाणाचा दुवा (link) दिलात तर बरे !

    धन्यवाद !

    उत्तर द्याहटवा
  2. राहुल,
    हे लिखान ई-मेल द्वारे मिळाले ... त्यामुळे लेखकाचे नांव समजु शकले नाही. संबंधित लिखानाला आपला दुवा दिला आहे.

    चुक-भुल माफ असावी.

    ... गुरु.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा