सदगुरुक्रुपे आज समजते क्षण क्षण आहेत मोलाचे...
सर्वच दिवस सुखाचे सुखाचे येवोत स्वागत करु नव वर्षाचे ...!
नव वर्षाचे स्वागत करण्या हर एक मानव सज्ज असे .
हरि भजनात कुणी मग्न असे तर नशेमध्ये कुणी धुंद असे
मानवप्राणी असे विचारी पण प्रत्येकाची नवी त-हा
स्वार्थी असे दुनिया सारी, परोपकारी संत खरा !!
मरण सर्वा अटळ आहे, तरी मरणा सारे घाबरती
अंत समयी सर्वा कळते क्षण मोलाचे आहे किती
क्षणोक्षणी मग धावा करती हात जोडुनी देवाचे..
सर्वच दिवस सुखाचे सुखाचे येवोत स्वागत करु नव वर्षाचे ...!!
घोर अशा या कलयुगी सदगुरु अवतरले
निराकाराचे ज्ञान देऊनी सर्व मानसांचे करती भले
सेवा स्मरण सत्संग करणे हे मानवाचे कर्म असे
संसारी राहुन परमार्थ साधा, वनी जायला सांगत नसे...!!
विश्वास सदगुरुंवरती ज्याचा, सुलभ सोपा मार्ग त्याचा..
"प्रसादानेही" आधार घेतला सदगुरुंच्या चरणाचा ..
सदगुरुंची क्रुपा होता, सार्थक होते जीवनाचे
सर्वच दिवस सुखाचे सुखाचे येवोत स्वागत करु नव वर्षाचे ...!
..................... कवी प्रसाद सकट [९८६७ ०९२४८४]
Show/ Hide Image Version! [+ / -]
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा