सुविचार

Show/ Hide Image Version! [+ / -]


मैत्रीचे धागे कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही बारीक असतात. पण लोखंडाच्या तारेहुनही मजबुत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाही तर वज्राघातानेही तुटणार नाहीत!

संवाद दोनच माणसांचा असतो. त्यांच्यात तिसरा माणुस आला ली त्याच्या गप्पा होतात.

कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं
कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे...
म्हणुनच खडक झिजतात..
प्रवाह रुंदावत जातो..

पोरगी म्हणजे वा-याची झुळुक.. अंगावरुन जाते, अमाप सुख देऊन जाते पण तिला धरुन ठेवता येत नाही..

जाळायला काही नसलं की पेटलेली काडेसुध्दा आपोआप विझते.

खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो.

शस्त्रक्रिया होण्यापुर्वी रोगी घाबरलेला असतो. बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो.

घेणा-याच्या अपेक्षेपेक्षा देणा-याची ऐपत नेहमीच कमी असते.

बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं ही शोकांतिका जास्त भयाण!

टिप्पण्या