सुविचार

Show/ Hide Image Version! [+ / -]


  • सगळे कागद सारखेच... त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते..!
  • रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही. त्याचा त्रास होतो. पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो कुठे बसुनओरडतो हे सापडत नाही, याचा होतो.
  • ड्रिंक्स घेतल्यावर न घेतलेल्या माणसापेक्षा जागरुक राहावं लागतं.
  • आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो ही जाणीव फार भयप्रद आहे.
  • सगळे वार परतवता येतात पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही
  • कोणत्याही सुखाच्या क्षणी आपण होशमध्ये असणं यातच त्या क्षणाची अपुर्वाई आहे.
  • रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगु शकतो, पण तुळस वॄंदावनात राहते. तिच्यापुढं आपल्यालाच उभंरहावं लागतं.
  • आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं - आपला उत्कर्ष होतोय.
  • ज्याच्या असण्याला अर्थ असतो त्यांचाच नसण्याची पोकळी जाणवते.
  • अत्तराची बाटली संपतानाच जपायची असते.
  • दु:ख पराभवाचं नसतं। फसवणुक करुन पराभव गळयात मारला जातो, त्याचं दु:ख होतं. कर्णाची बाजू अन्यायाची असतानाही त्याला मरण ज्या परिस्थितीत आलं त्याचं वाईट वाटतं.
वरील सर्व विचार हे वेगवेगळ्या व्यक्तिंच्या नावाने आमच्याकडे आले आहेत.... पैकी, पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, खांडेकर या काही मान्यवर व्यक्ती.... त्यामुळे [ लेखकांविषयी आपले ज्ञान दाखवत] उगाचच गैर-समज करुन घेऊ नये...!

टिप्पण्या