जगण्यासाठी अजुन काय हवं ?

एक आई, एक बाप,
एक भाऊ, एक बहिण,
असं एखादं घर हवं...
जगण्यासाठी अजुन काय हवं ?

एक मित्र, एक शत्रु,
एक सुख, एक दुख,
असं साधं जीवन...
जगण्यासाठी अजुन काय हवं ?

एक प्रेयसी, एक अर्धांगिनी,
एक खरं प्रेम, एक भक्कम आधार,
यात कुठेही नसला प्रेमाचा अभाव तर...
जगण्यासाठी अजुन काय हवं ?

एक सुर्य, एक चंद्र,
एक दिवस, एक रात्र,
फक्त सगळं समजायला हवं...
जगण्यासाठी अजुन काय हवं ?

एक शक्ती, एक भक्ती,
एक सुड, एक आसक्ती,
ठायी जर असेल युक्ती तर...
जगण्यासाठी अजुन काय हवं ?

थोडा पैसा, थोडी हाव,
थोडा थाट, थोडा बडेजाव,
सगळ्यांच्या तोंडी आपलेच नाव...
जगण्यासाठी अजुन काय हवं ?

एक नोकरी, एक छोकरी,
तीन मुलं अन खायला भाकरी,
उत्तम प्रकारची जर असेल चाकरी, तर...
जगण्यासाठी अजुन काय हवं ?

एक समुद्र, एक नदी,
एक शांत, एक अवखळ,
जीवनात असली जर एक तळमळ,
जगण्यासाठी अजुन काय हवं ?

एक इच्छा, एक आशा,
एक मागणं, एक अभिलाषा,
मनात भरलेली सदा नशा,
जगण्यासाठी अजुन काय हवं ?


.................................


   Name: Nitin Salvi
   Email:nitin3_salvi[at]yahoo.co.in
   Mob: ९८९२०१९९०२

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा