"जोडी तुझी माझी"

भांडल्याशिवाय जेवण जात नाही ज्यांना
त्या दोघी म्हणजे ..... सासु आणि सुना

ईच्छा नसतानाही चेहरे एकमेकांसमोर ठेवतार हसरे
ते दोघं म्हणजे ..... जावई आणि सासरे

एकमेकिंच्या पराभवातच मानतात आपला जय
त्या दोघी म्हणजे ..... नणंद आणि भावजय

एकाच घरात राहुनही गॅस मात्र वेगळा हवा
त्या दोघी म्हणजे ..... जावा जावा

बोलणं असतं कमी पण भांडायला असतात अधीर
ते दोघं म्हणजे ..... वहिणी आणि दीर

या सा-या नात्यांमुळे ज्या समस्या निर्माण होतात
त्या समस्या जे सामंजस्याने हाताळतात
ते दोघं म्हणजे ..... यशस्वी पती पत्नी

....... संदेश म्हात्रे [९८३३९७१३७६]

टिप्पण्या