कसलंतरी दु:ख उराशी बाळगून,
दारुचे घोट घटाघट पिऊन,
त्याच नशेत तराठ होऊन,
माणुस जातो भलत्याच दुनयेत हरवुन!
दु:खनिवारणाची ही पध्दत कोणती,
झिंग आणणारी नशा कोणती,
हे वाईट सर्व जाणती,
तरीही पाउले त्याच गुत्त्यावर वळती!!
मग एखादयाचं मुल विचारतं,
आमच्या बाबांना पाहिलंत का?
कुणीतरी सांगतं - तिकडे पडलेत
नशेत फारच तराठ झालेत!!
मलं त्यांना उचलुन चालु लागतात,
ज्यांचा आधार हवा, त्यालाच आधार देत,
आशाळभुत नजर खाली बघत,
जो आधार देणार त्यालाच आधार देत!!!
घरी आणुन अंथरुणावर टाकला,
तो निवांतपणे शांतीने झोपला,
पण बायका-मुलांचा डोळा नाही लागला,
पुढे येणारा काळ दिसु लागला..!!!
खुप खुप विचार केला,
पण याचा अर्थ नाही कळला,
परिस्थितीचा अर्थ मनात सलला,
दैवाचा हा खेळ कुणाला कळला..!!!
.................................
Email:nitin3_salvi[at]yahoo.co.in
Mob: ९८९२०१९९०२
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा