माझी भटकंती: चावंड किल्ला

टिप्पण्या


  1. प्रबळगड आणि कलावंती दुर्ग बघितला आहे किवा पाहायचा आहे अशा हौशी पर्यटक मित्रांना, हा ट्रेक आणि निसर्ग सौंदर्यपूर्ण परिसर कसा अनुभवायचा? याच्याबद्दल माझे स्थानिक मत..
    तुम्ही दीड तास पायपिट करून प्रबळ माची या गावामध्ये पोहचत. त्यावेळी तुम्ही खूप दमलेले असतात. मग कलावंतीण किवा प्रबळगडामधील एखादे ठिकाण बघून तुम्ही परत जातात. पण जर कलावंतीण तसेच प्रबळगड आणि आजूबाजूचा स्थानिक परिसर जर पूर्णपणेअनुभवायचा असेल तर मी एक स्थानिक म्हणून मार्गदर्शन नक्कीच देईन. तुम्ही एक रात्र गावामध्ये राहा. सकाळी माची गावामध्ये पोहचल्यावर चहा नास्ता करून कलावंतीण दुर्ग पाहायला जा आणि पुन्हा गावामध्ये आल्यावर गावाच्या उजवीकडे असणारे शिवशंकराचे मंदिर पाहू शकतात. गावाच्या कड्यावरून दिसणारा सुर्यास्त हे तर अदभूतपूर्व दृश्य आहे हे अनुभवा, संध्याकाळच्या संधीप्रकाशात कड्यावरुन पायखाली सोडून बसा आणि मनाला येईल तेवढ्या मोठ्या पडद्यावर खाली दरीत दिसणारा सोनेरी प्रकाश आणि त्यावर चमचमणा-या नदीचा आणि तिच्या तीराशी चाललेला रोमान्स अनुभवा. त्या सारखा आनंद जगातले कुठलेही मल्टीप्लेक्स देऊ शकणार नाही. विशेषकरून गावाच्या कड्यावरून रात्री लग्नसराईच्या लाईटिंगच्या प्रमाणे चमकणारे मुंबई शहर, रसायनी, पनवेल आणि आजुबजुचा प्रदेश कसा नटलेला दिसतो. त्यामुळे असा भास होतो कि शाही लग्नाचा समारंभ आहे, संध्याकाळचा हाडं गोठवणारा गारठा, रानवारा. मग याच्यापुढे एसी नक्कीच फिक्का पडेल. पावसात कड्यावरून समुद्राकडे घाई-घाईने वाट काढत जाणारे धोधो कोसळणारे धबधबे, शिवाय दुसऱ्या दिवशी प्रबळगड ट्रेकला जा. प्रबळगडाचा माथा म्हणजे एक मोठे पठार आहे. सर्व पठारी भाग हा
    जंगलाने व्यापलेला आहे. गडावर एक गणेशमंदिर आहे. तसेच चार पाच पाण्याच्या टाक्यासुद्धा आहेत. प्रबळगडावर अनेक बुरुज आहेत. तसेच कालाभूरुज आणि बोरीची सोंड यासारखी ठिकाणी आहेत, काळ्याभूरुजावर एक मोठा चुन्याचा ढीग आहे. हा चुन्याचा ढीग भूरुज बांधण्यासाठी पूर्वी वापर करण्यात आला असेल असे वाटते. गडावर तीन चार इमारतींचे अवशेष आहेत. घनदाट जंगल असल्याने हे सगळे बघणे वाटाड्याची गरज भासते. गडावरून माथेरान, मोरबे धरण, तसेच कालाभूरुज आणि बोरीची सोंड यासारख्या ठिकाणाचे विविध पाँईंटस् फार सुंदर दिसतात. या दुर्गावरून भोवताली असणारे माथेरान, चांदेरी व पेब दुर्ग, एर्शल गड,कर्नाला किल्ला व समोर असणारे मुंबई शहर सहजपणे ओळखून येते. प्रथम इंग्रजांनी प्रबळगडाचा माथेरान सारखे थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित करण्याचा विचार केला होता. मात्र पाण्याच्या दुर्भिक्षतेमुळे तो विचार मागे पडला. हे सगळे पाहून झाल्यावर पुन्हा माचीगावात येऊन थोडा आराम करून संध्याकाळची बस पकडून परतीचा मार्ग धरावा. यामुळे तुमचा प्रबळगड आणि कलावंतीण ट्रेक तर होईलच पण आजूबाजूचा निसर्ग परिसराचा आनंद पण मिळेल. त्यामुळे ट्रेकच्या निमिताने एक पिकनिक चा अनुभव नक्कीच येईल असे मला तरी वाटते.
    More Information
    Website -http://prabalgad.jigsy.com/
    Blogsite -http://prabalgad.blogspot.in/

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा