मराठी म्हणी

  1. नाचता येईना म्हणे अंगण वाकडे, स्वयंपाक येईना म्हणे ओली लाकडे.
  2. नात्याला नाही पारा, निजायला नाही थारा.
  3. नाम असे उदार कर्ण, कवडी देता जा प्राण.
  4. नारो शंकराची घंटा.
  5. नालासाठी घोडं.
  6. नाव्ह्याचा उकरंडा कितीही उकरला तरी केसच निघणार.
  7. नाही चिरा, नाही पणती.
  8. नाही निर्मल मन काय करील साबण.
  9. निर्लज्याच्या गांडीवर घातला पाला गार लागला अजून घाला.
  10. नेमेचि येतो मग पावसाळा.
  11. नेशीण तर पैठणी नाहीतर नागवी बसेन.
  12. न्हाणीला बोळा आणि दरवाजा मोकळा.
  13. पंचमुखी परमेश्वर.
  14. पंत मेले, राव चढलॆ.
  15. पडतील स्वाती तर पिकतील मोती.
  16. पडत्या फळाची आज्ञा.
  17. पडलो तरी नाक वर.
  18. पडू आजारी, मौज वाटे भारी.
  19. पत्रावळी आधी दोणा, तो जाव शहाणा.
  20. पदरी पडले आणि पवित्र झाले.
  21. परदु: शितल असते.
  22. पळत भु थोडी.
  23. पहिला दिवशी पाहुणा, दुसऱ्या दिवशी पयी, तिसऱ्या दिवशी थारी अक्कल आधी गयी.
  24. पहिले पाठे पंच्चावन्न.
  25. पाचावर धारण बसली.
  26. पाटलाचं घोडं महाराला भुषण.
  27. पाठीवर मारावे पण पोटावर मारू नये.
  28. पाण्यात म्हैस वर मोल.
  29. पाण्यात राहून माशाशी वैर?
  30. पाण्यावाचून मासा झोपा घे केसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.
  31. पादऱ्याला पावटाचे निमित्त.
  32. पादा पण नांदा.
  33. पानामागून आली अन तिखट झाली. (अगसली ती मागासली, मागाहून आली ती गरोदर राहीली.)
  34. पाय धु म्हणे तोडे केवढ्याचे?
  35. पायलीची सामसूम, चिपट्याची धामधूम.
  36. पायाखालची वाळू सरकली.
  37. पारध्याची गोड गाणी हरिणीसाठी जीव घेणी.
  38. पारावरला मुंजा.
  39. पालथ्या घडावर पाणी. (पालथ्या घागरीवर पाणी.)
  40. पिंपळाला पाने चार.
  41. पिकतं तिथे विकत नाही.
  42. पितळ उघडे पडले.
  43. पी हळद अऩ हो गोरी.
  44. पुढच्याच ठेच मागचा शहाणा.
  45. पुत्र व्हावा ऎसा गुंडा ज्याचा तिन्ही लौकी झेंडा.
  46. पुराणातील वानगी पुराणात.
  47. पुरुषांचे मरण शेती, बायकाचे मरण वेतीं (प्रसुती).
  48. पेरावे तसे उगवते.
  49. पैशाकडेच पैसा जातो.
  50. पोकळ वाशांचा आवाज मोठा.
  51. पोट भरे खोटे चाले.
  52. पोटात नाही दाणा म्हणे रामकृष्ण म्हणा.
  53. प्रयत्नांती परमेश्वर.
  54. प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे.
  55. फुकट घालाल जेवू तर सारेजन येवू, काही लागेल देणं तर नाही बा येणं.
  56. फुकटचंबू बाबूराव.
  57. फुकटचे खाणे आणि हागवणीला कहर.
  58. फुका दिले झोका म्हणून पांग फेडलेस का लेका?
  59. बड़ा घर पोकळ वासा.
  60. बळी तो कान पिळी.
  61. बाईचा मात्र हट्ट, पुरुषाची मात्र जिद्द.
  62. बाईल गेलीया अऩ झोपा केला.
  63. बाईल वेडी लेक पिसा, जाव मिळाला तोहि तसा.
  64. बाज बघुन बाळंतीण व्हावे.
  65. बाजारात नाही तुरी भट भटणीला मारी.
  66. बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा.
  67. बाप दाखव नाही तर श्राध्दं कर.
  68. बाबा गेला आणि दशम्याही गेल्या.
  69. बायको नाही घरी धोपाटणे उड्या मारी.
  70. बारा गावच्या बारा बाभळी.
  71. बारा घरचा मुंजा उपाशी.
  72. बारा झाली लुगडी तरी भागुबा उघडी. (बारा लुगडी तरी बा उघडी.)
  73. बाळाचे पाय पाळ्ण्यात दिसतात.
  74. बुडत्याचे पाय खोलात.
  75. बुडत्याला काडीचा आधार.
  76. बुढ्ढ्याले आली मस्ती, नातींशी खेळे कुस्ती.
  77. बेशरमाच्या ढुंगणाला फुटले झाड तो म्हणतो मला सावली झाली.
  78. बोल बोल नाऱ्या धोतर गेलं वाऱ्या.
  79. बोलणाऱ्याचे उडीद सुध्दा विकले जातात पण बोलणाऱ्याचे गहू पडुन राहतात.
  80. बोलण्यात पट्टराघू, कामाला आग लावू.
  81. बोलाचीच कढी अऩ बोलाचाच भात.
  82. बोले तैंसा चाले त्याची वंदावी पाऊले.
  83. बोलेल तो करेल काय? गरजेल तो पडेल काय?
  84. भटाला दिली ओसरी भट हात पाय पसरी.
  85. भरल्या ब्राह्मणाला दही करकरीत.
  86. भरवश्याच्या म्हशीला टोणगा.
  87. भले भले गेले गोते खात, झिंझुरटे म्हणे माझी काय वाट?
  88. भाकरी पहावी काठात आणि मुलगी पहावी ओठात.
  89. भागला पडला बावीत, बाव झाली झळझळीत.
  90. भातापेक्षा वरण जास्त.
  91. भावीण नाचते म्हणून न्हावीण नाचते.
  92. भिंतीला कान असतात.
  93. भिक नको पण कुत्रा आवर.
  94. भितीवर डोकं आपटून काही होत नाही उलट स्वत:लाच खोक पडते.
  95. भित्यापाठी ब्रम्हराक्षस.
  96. भुकेच्या तापे करवंदीची कापे.
  97. भुकेपेक्षा ब्रम बरा.
  98. भुकेला केळं, उपासाला सिताफळ.
  99. भुकेला कोंडा अन निजेला धोंडा.
  100. भुकेला पिकलं काय? अऩ हिरवं काय?
  101. भुरक्यावाचून जेवण नाही आणि मुरक्यावाचून बा नाही.
  102. भोळी बा भोळी, लुगड्यावर मागते चोळी, खायला मागते पुरणपोळी.
  103. लागले म्हणून कोपऱ्याने खणू नये.
  104. मड्याच्या टाळुवरचे लोणी खाणारा.
  105. मनी चिंती ते वैरीही चिंती.
  106. मनी नाही भाव देवा मला पाव.
  107. मनी वसे ते स्वप्नी दिसे.
  108. मरावे परी किर्तिरुपे उरावे.
  109. मला नं तुला, घाल कुत्र्याला.
  110. मला पहा अऩ फुले वहा.
  111. महादेवापुढे नंदी असायचाच.
  112. मांजर डोळे मिटून दुध पिते पण ते जगाला दिसतचं.
  113. माकड म्हणतं माझीच लाल.
  114. माकडाच्या हातात कोलीथ.
  115. माझा लोक तुझ्या घरी अन तुपानं तोंड भरी.
  116. माझा ह्यां असा, बायकोचा तां तसा, गणपतीचा होऊचा कसा?
  117. माणूस पाहून शब्द टाकावा, अऩ जागा पाहून घाव मारावा.
  118. मातीचे कुल्ले वाळले की पडायचेच.
  119. मानूस म्हनावा तर अक्कल न्हायी आनी गाढाव म्हनावा तर शेपुट नायी.
  120. माय मरो पण मावशी उरो.
  121. मारा पण तारा.
  122. मिंया बिबी, तेगार भिंतीला उभी.
  123. मिया मुठभर, दाढी हातभर.
  124. मी नाही त्यातली अऩ कडी लावा आतली.
  125. मी बा संतीण माझ्या मागे दोन तीन.
  126. मी हसते लोकांना अनं शेबुड माझा नाकाला.
  127. मुंगी व्यायली, शींगी झाली, दुध तिचे किती, बारा रांजण भरून गेले, सतरा हत्ती पिउन गेले.
  128. मुंगी हत्तीच्या ढुंगणाला चावू शकते पण हत्ती मुंगीच्या नाही.
  129. मुंगेच्या मुताला महापूर.
  130. मुग गिळून गप्प बसावे.
  131. मुर्ती लहान पण किर्ती महान.
  132. मुळांपोटी केरसुनी.
  133. मेलेलं कोंबडं आगीला भित नाही.
  134. मेल्या म्हशीला शेरभर दुध.
  135. मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही.
  136. मोडेन पण वाकणार नाही.
  137. मोह सुटेना अऩ देव भेटेना.
  138. म्हननाऱ्यानं म्हण केली, अऩ जाननाराले अक्कल आली.
‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ ‌‌‌‌‌ ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌

आभार - PVRSSPR

टिप्पण्या

  1. sagalya mhanI mi vaacahalya. tyapaiki 22,24,26,30,33,34,62,85,97,122,123. yaa kramaakaanchya mhanimadhye durustya karan avashyak aahe se vatate.aapan punha ekada vaachun durustya karavayat hi namra vinanti.
    NY-USA

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा