- डोळे आणि कान यांच्यात चार बोटाचे अंतर असते.
- डोळ्याला नाही असू, तुझी मेली सासू.
- ढवळ्याशेजारी बांधला पावळया, वाण नाही पण गुण लागला.
- ढुंगणाखाली आरी अऩ चांभार पोरं मारी.
- ढुंगणाचं काढून डोक्याला बांधणे.
- ढोंग धतोरा, हाती कटोरा.
- ढोरात ढोर, पोरात पोर.
- त वरून ताकभात.
- तण खाई धन.
- तरण्या झाल्या बरण्या आणि म्हाताऱ्या झाल्या हरण्या.
- तरण्याला लागली कळ, म्हाताऱ्याला आलयं बळ.
- तळहाताने चंद्र झाकत नाही.
- तळे राखी तो पाणी चाखी.
- तवा तापला तोवर भाकरी भाजून घ्यावी.
- तहान लागल्यावर आड खणणे.
- ताकापुरते रामायण.
- ताकाला जायचे अनं भांडे लपवायचे.
- तागास तूर लागू न देणे.
- ताटाखालचं मांजर.
- ताटात सांडलं काय नि वाटीत सांडलं काय एकच.
- तारेवरची कसरत.
- तीन तिघडा काम बिघाडा.
- तु दळ माझे, मी दळीण गावच्या पाटलाचे.
- तुकाराम बुवांची मेख.
- तुझं अऩ माझं जमेना तुझ्यावाचुन करमेना.
- तुम्ही करा अऩ आम्ही निस्तरा.
- तुरात दान, महापुण्य.
- तुला नं मला, घाल कुत्र्याला.
- तुळशी तुळशी तुला पाणी कळशी कळशी, पण वेळ मिळेले त्या दिवशी.
- तेरड्याचे रंग तीन दिवस.
- तेल गेले, तुप गेले, हाती आले धोपाटणे.
- तेलणीवर रुसली अंधारात बसली.
- तोंड करी बाता अन ढुंगण खाई लाथा.
- तोंड दाबून बुक्क्यांचा मार.
- तोंडात तीळ भिजत नाही.
- तोबऱ्याला पुढे लगामाला मागे.
- त्यात काही राम नाही.
- थांबला तो संपला.
- थाट राजाचा, दुकान भाडगुंजाचे.
- थेंबे थेंबे तळे साचे.
- थोडक्यात नटावे नि प्रेमाने भेटावे.
- थोरा घराचे श्वान त्याला देती सर्व मान.
- थोरांचे दुखणे आणि मणभर कुंभणे.
- दक्षिणा तशी प्रदक्षिणा.
- दगडापेक्षा विट मऊ.
- दमडीची नाही मिळकत आणि घडीची नाही फुरसत.
- दहा गेले पाच उरले.
- दहा मरावे पर दहांचा पोशिंदा मरु नये.
- दही वाळत घालून भांडण.
- दांत आहे तर चणे नाहीत, चणे आहेत तर दांत नाहीत.
- दांत कोरून पोट भरतो.
- दाणा दाणा टिपतो पक्षी पोट भरतो.
- दानवाच्या घरी रावण देव.
- दाम करी काम.
- दारात नाही आड म्हणे लावतो झाड.
- दिंडी दरवाजा उघडा ठेवायचा आणि मोरीला बोळा घालायचा.
- दिल्या भाकरीचा सांगितल्या चाकरीचा.
- दिवस गेला रेटारेटी, चांदण्यात बसली कापूस वेचीत.
- दिवस बुडाला मजूर उडाला.
- दिवसा चुल रात्री मूल.
- दिवाळी दसरा हात पाय पसरा.
- दिव्याखाली नेहमीच अंधार.
- दिसतं तस नसतं म्हणून तर जग फसतं.
- दुःख रेड्याला न डाग पखालीला.
- दुखणे हत्तीच्या पायाने येते आणि मुंगीच्या पायाने जाते.
- दुध पोळलं की ताक फुंकून प्यावे.
- दुधापेक्षा सायीवर प्रेम जास्त.
- दुभत्या गाईच्या लाथा गोड.
- दुरून डोंगर साजरे.
- दुर्जनसंगापेक्षा एकांतवास बरा.
- दुष्काळात तेरावा महिना.
- दुसऱ्याची कामीनी ती मानवाची जननी.
- दृष्टी आड सृष्टी.
- दृष्टी सर्वांवर प्रभुत्व एकावर.
- दे बाय लोणचे, बोलेन तुझ्या हारचे!
- दे माय धरणी ठाय. (हे माय, धरणी ठाय.)
- देखल्या देवा दंडवत.
- देण कुसळाच, करणं मुसळाच.
- देणं न घेणं आणि कंदिल लावून येणं.
- देणाऱ्याचे हात हजार.
- देणे ना घेणे दोन्ही सांजचे येणे.
- देणे ना घेणे रिकामे गाणे.
- देव तारी त्याला कोण मारी.
- देव भावाचा भुकेला.
- देव लागला द्यायला पदर नाही घ्यायला.
- देवाचं नावं अऩ स्वताच गावं.
- देवाची करणी आणि नारळात पाणी.
- देश तसा वेश.
- देह देवळात चित्त पायतणात.
- दैव देतं अऩ कर्म नेतं.
- दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ.
- दोघींचा दादला उपाशी.
- दोन डोळे शेजारी, भेट नाही संसारी.
- दोन्ही घरचा पाहुणा उपाशी.
- द्या दान सुटे गिरान (ग्रहण).
- धनगराच्या मॆंढ्या अन शेतकऱ्याला लेंढ्या.
- धनवंताला दंडवत.
- धन्याला धतुरा आणि चोराला मलिदा.(धन्याला कन्या अनं चोराला मलिदा.)
- धमनीतला पडला भोक हवा गेली बर फोक.
- धरल तर चावतय आन सोडलर तर पळतय.
- धर्माने दिले नेसायला तर परसात गेली मोजायला.
- धाक ना दरारा, फुटका नगारा.
- धावत्यापाठी यश.
- धावल्याने धन मिळत नाही.
- धु म्हटले की धुवायचे लोंबतय काय ते नाही विचारायचे. (वाढ म्हणलं की वाढावं कोणं जेवतेयं वाकून बघू नये.)
- धुडुम धडवा अन आंब्बसेला (अमावसेला) पाडवा.
- धुतल्या तांदळातला खडा.
- न कर्त्याचा वार शनिवार.
- न खाणाऱ्या देवाला नेवेद्य.
- न लागो पुत्राचा हात पण लागो डोंब्या महाराची लाथ.
- नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न.
- नकटे व्हावे पण धाकटे होऊ नये.
- नगाऱ्याची घाय तिथे टिमकीचे काय?
- नमनाला घडाभर तेल.
- नरो वा कुंजारोवा.
- नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे.
- नवरा नाही घरी सासरा जांच करी.
- नवऱ्याने मारले पावसाने झोडपले तक्रार कुणाकडे न्यायची.
- नव्याची नवलाई.
- नव्याचे नऊ दिवस.
- नसुन खोळंबा असुन दाटी.
- ना घरचा ना घाटचा.
- नांदणाऱ्याला पळ म्हणायचे आणि पळणाऱ्याला नांद म्हणायचे.
- नांव अन्नपुर्णा, टोपल्यात भाकर उरेना.
- नांव गंगुबाई अऩ तडफडे तान्हेने. (नांव गंगाबाई अन तडफडे तहानेने). (नांव गंगाबाई, रांजनात पाणी नाही).
- नांव महीपती, तीळभर जागा नाही हाती.
- नांव मोठे लक्षण खोटे.
- नांव सगुणी करणी अवगुणी.
- नांव सुलोचना आणि डोळ्याला चष्मा.
- नांव सोनुबाई अन हाथी कथिलाचा वाळा.
- नाक दाबले की तोंड उघडते.
- नाकपेक्षा मोती जड.
- नाकाला नाही जागा, नाव चंद्रभागा
- नाकावर पदर अन विशीवर नजर.
- नागड्या कडे उघडा गेला आणि हिवाने मेला.
- नागोबा म्हसोबा पेंश्याला दोन, पंचमी झाल्यावर पुजतयं कोण?
आभार - PVRSSPR
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा