मराठी म्हणीमराठी म्हणी, म्हण, म्हणी

  1. सरड्याची धाव कुंपणापर्यंत.
  2. सळो की पळो केले.
  3. साखरेचे खाणार द्याला देव देणार.
  4. साठी बुध्दी नाठी.
  5. साडी नेली बायनं नि चिंधी नेली गायनं.
  6. सात सुगरणी, भाजी अळणी.
  7. साता उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी संपूर्ण.
  8. साता समुद्राकडे राजाने लावला भात, ऐक ऐक शीत हात.
  9. साधली तर शिकार नाही तर भिकार.
  10. साधी राहणी अनं उच्च विचार सरणी.
  11. साध्वा जाते विधवेपाशी आशिर्वाद मागायला, ती म्हणते माझ्यासारखीच हो!
  12. साप मुंगसाचे वैर.
  13. साप म्हणू नये आपला, नवरा म्हणू नये आपला.
  14. सारा गांव मामाचा एक नाही कामाचा.
  15. सासू सासरा जांच करे तिसरा.
  16. सासू नाही घरी, नणंद जाच करी.
  17. सासू मेली ठीक झाले, घरदार हाती आले.
  18. सासू सांगे सुने बोध, आपण पी ऊन ऊन दुध.
  19. सासू सुनेची भांडणं, सगळ्या गावाला आमंत्रणं.
  20. सुंठेवाचून खोकला गेला.
  21. सुईण आहे, तो पर्यंत बाळंत होऊन घ्यावे.
  22. सुख रा एवढे दु: पर्वता एवढे.
  23. सुगंध पसरावयाचा असेल तर चंदनाला झिजावे लागते.
  24. सुतावरून स्वर्ग गाठायचा.
  25. सुसरबा, तुझी पाठ .
  26. सोन्याची सुरी असली म्हणून काय उरात खुपसुन घ्यायची.
  27. सोन्याहून पिवळे.
  28. स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.
  29. स्वत:ची सावली विकून खाणारी माणसं.
  30. स्वभावाला औषध नाही.
  31. स्वामी तिन्ही जगाचा ईविना भिकारी.
  32. हगत्या लाज की बघत्या लाज?
  33. हजाराचा बसे घरी, दमडीचा येरझाऱ्या घाली.
  34. हजीर तो वजीर.
  35. हत्ती गेला अऩ शेपुट राहिले.
  36. हत्ती पोसवतो पण लेक नाही पोसवत.
  37. हत्तीवर अंबारी जाते कुत्री भुंकत राहतात.
  38. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र.
  39. हसणाऱ्याचे दांत दिसतात.
  40. हा सुर्य अऩ हा जयद्रथ.
  41. हागणाऱ्याला लाज नाही पण भागणाऱ्याला आहे.
  42. हात दाखवून अवलक्षण.
  43. हात फिरे तिथे लक्ष्मी वसे.
  44. हातचं (गणित) ठेवून वागावे.
  45. हातचे सोडून पळत्याच्या मागे.
  46. हातच्या काकणाला आरसा कशाला?
  47. हाताची पाचही बोटे कधीही सारखी नसतात.
  48. हातात कवडी विद्या दवडी.
  49. हातानं होईना काही तोंड घेतं घा.
  50. हाती घ्याल ते तडीस न्या.
  51. हाती नाही अडका, बाजारात धडका.
  52. हाती नाही आणा, मला कारभारी म्हणा.
  53. हिंग गेला, वास राहीला.
  54. ही काळ्या दगडावरची रेघ.
  55. हे बालाजी, छप्पन्न कोटींचा चतुर्थांश.
  56. होता जिवा म्हणून वाचला शिवा.
  57. हौसेनं केला पति, त्याला भरली रक्तपीती.
‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ ‌‌‌‌‌ ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌

आभार - PVRSSPR

टिप्पण्या