- "ग" ची बाधा झाली.
- अंगात नाही बळ आणि चिमटा घेउन पळ.
- अंगापेक्षा बोंगा जास्ती.
- अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज.
- अंगावर आल्या गोणी तर बळ धरले पाहिजे टुणी.
- अंगावरचे लेणे, जन्मभर देणे.
- अंथरूण पाहून पाय पसरावेत.
- अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं.
- एक पंथ दोन काज.
- एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात.
- एक पाय मोडल्याने गोम लंगडी होत नाही.
- एक पुताची माय वळणीवाटे जीव जाय.
- एक पुत्री रडते, सात पुत्री रडते आणि निपुत्री पण रडते.
- एक मांसा अन खंडीभर रस्सा.
- एक वेळ जेवायचे ताट द्यावे पण पाट देवू नये.
- एकटा जिव सदाशिव.
- एकमेका सहाय्य करू अवघे धरु सुपंथ.
- एका कानाचे दुसऱ्या कानाला कळत नाही.
- एका कानाने ऐकावे, दुसऱ्या कानाने सोडून द्यावे.
- एका कानावर पगडी, घरी बाईल उघडी.
- एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे.
- एका माळेची मणी, ओवायला नाही कुणी.
- एका म्यानात दोन तलवारी राहात नाहीत.
- एका हाताने टाळी वाजत नाही.
- एकाची जळते दाढी, दुसरा त्यावर पेटवी बिडी.
- एकादशी अनं दुप्पट खाशी.
- एकादशीच्या घरी शिवरात्र.
- एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारु नये.
- ऐंक रे भैंऱ्या, आंब्याच्या कैऱ्या.
- ऐंकावे जनाचे करावे मनाचे.
- ऐंट राजाची अऩ वागणूक कैंकाड्याची.
- ऐंशी तिथे पंच्याऐंशी कर ंडे पुरणपोळ्या.
- ऐतखाऊ गोसावी, टाळ भैरव बैरागी.
- ओ म्हणता ठो येईना.
- ओठात एक आणि पोटात एक.
- ओठी ते पोटी.
- ओल्या बरोबर सुके जळते.
- ओळख ना पाळख अनं मला म्हणा लोकमान्य टिळक.
- ओसाड गावी एरंडी बळी.
- औटघटकेचे राज्य.
- औषधावाचून खोकला गेला
- औषधावाचून खोकला गेला.
- कंबरेचं सोडलं, डोक्याला बांधलं.
- कच्च्या गुरुचा चेला.
- कठीण समय येता कोण कामास येतो.
- कडु कारले तुपात तळले, साखरेत घोळले, कडू ते कडूच.
- कण्हती कुथती, मलिद्याला उठती.
- कधी गाडीवर नाव, कधी नावेवर गाडी.
- कपटि मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा.
- कपिलाषष्टीचा योग.
- कमळ भुंग्याला अन चिखल बेडकाला.
- कर नाही त्याला ड़र कशाला?
- करंगळी सुजली म्हणजे डोंगरा एवढी होईल का?
- करणी कसायची, बोलणी मालभावची.
- करतेस काय वाती अन ऐकतेस काय माती.
- करवंदीच्या जाळीला काटे.
- करायला गेलो एक अऩ झाले एक.
- करायला गेलो एक आणि झाले भलतेच.
- करावे तसे भरावे.
- करीन ती पूर्व.
- करुन करुन भागले अनं देवपुजेला लागले.
- करुन गेला गाव आणि कांदळकराचे नाव.
- करू गेले काय? अन उलटे झाले काय?
- कर्कशेला कलह गोड, पद्मीनीला प्रीती गोड.
- कळते पण वळत नाही.
- कशात काय अन फाटक्यात पाय.
- कशात ना मशात, माकड तमाशात.
- कष्ट करणार त्याला देव देणार.
- का ग बाई उभी, घरात दोघी तिघी.
- काकडीची चोरी, फाशीची शिक्षा.
- काका मामांनी भरला गांव, पाणी प्यायला कोठे जाव?
- काखेत कळसा अऩ गावाला वळसा.
- काजव्याकडून सुर्याची समीक्षा.
- काट्याचा नायटा होतो.
- काट्याने काटा काढायचा.
- काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही.
- काडी चोर तो माडी चोर.
- कानात बुगडी, गावात फुगडी.
- काप गेले आणि भोके राहिली.
- काप गेले नि भोका रवली.
- काम कवडीचं नाही अनं फुरसत घडीची नाही.
- काम ऩ धंदा, हरी गोविंदा.
- काम ना धाम अनं उघड्या अंगाला घाम.
- काम नाही कवडीचं, रिकामपण नाही घडीच.
- काम नाही घरी सांडून भरी.
- कामापुरता मामा अऩ ताकापुरती आजी.
- काय करु अऩ कस करु?
- काय बाई अशी तु शिकवले तशी.
- काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
- काळी बेंद्री एकाची, सुंदर बायको लोकाची.
- कावळा घातला कारभारी गु आणला दरबारी.
- कावळा बसायला आणि फांदी तुटायला.
- कावळ्याचे दांत शोधण्यासारखे (मोजण्यासारखे).
- कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.
- कावळ्याने कितीही अंग घासले तरी बगळा होत नाही.
- कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते.
- काशी केली, गंगा केली, नशिबाची कटकट नाही गेली.
- कुंपणच शेत खातय तर जाब विचारायचा कुणाला?
- कुंभाराची सून कधीतरी उकिरड्यावर येईलच.
- कुठे इंद्राची ऐरावत आणि कुठे शांभाट्टाची तट्टानी.
- कुठे जाशी भोगा तर तुझ्या पाठी उभा.
- कुठे तरी पाल चुकचुकतेय.
- कुठेही जा, पळसाला पाने तीनच.
- कुडास कान ठेवी ध्यान.
- कुडी तशी पुडी.
- कुणाचा कुणाला पायपूस नाही.
- कुणाची म्हैस, कुणाला ऊठबैस.
- कुणाला कशाचे बलुत्याला पशाचे.
- कुणी वंदा, कुणी निंदा, माझा स्वहिताचा धंदा.
- कुत्र्या मांजराचे वैर.
- कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच.
- कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ.
- कुसंतनापेक्षा निसंतान बरे.
- केला जरी पोत बरेच खाली, ज्वाळा तरी ते वर उफाळी.
- केल्याने होत आहे आधी केले ची पाहिजे.
- केळी खाता हरकले, हिशेब देता टरकले.
- केळीवर नारळी अन घर चंद्रमोळी.
- केळ्याचा डोंगर, देई पैशाचा डोंगर.
- केवड्याने दान वाटले आणि गावात नगारे वाजले.
- कोंड्याचा मांडा करुन खाणे.
- कोंबडे झाकले म्हणून उजडायचे राहत नाही.
- कोणाला कशाचं तर बोड्कीला केसाचं. (कोणाला कशाचे मळणीला लसणाचे.)
- कोल्हा काकडीला राजी.
- कोल्ह्यास द्राक्षे आंबट.
- कोळसा कितीही उगाळला तरी काळाच.
- क्रियेवण वाचळता व्यर्थ आहे.
- खतास महाखत.
- खऱ्याचं खोटं अन लबाडाचं तोंड मोठं.
- खऱ्याला मरण नाही.
- खाई त्याला खवखवे.
- खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी.
- खाऊ जाणे तो पचवू जाणे.
- खाऊन माजावे पण टाकून माजू नये.
- खाजवुन अवधान आणणे.
- खाजवुन खरुज काढणे.
- खाटकाला शेळी (गाय) धार्जिणी.
- खाण तशी माती.
- खाणाऱ्याचे खपते, कोठाराचे पोट दुखते.
- खाणाऱ्याला चव नाही, रांधणाऱ्याला फुरसत नाही.
- खाणे खाण्यातले आणि दुखणे पहिल्यातले.
- खाणे बोकडासारखे आणि वाळणे लाकडासारखे.
- खातीचे गाल आणि न्हातीचे बाल लपत नाहीत.
- खादाड खाऊ लांडग्याचा भाऊ.
- खायचे दांत वेगळे, दाखवायचे वेगळे.
- खायला आधी, निजायला मधी आणि कामाला कधी.
- खायला कहर आणि भुईला भार.
- खायला कोंडा अऩ निजायला धोंडा.
- खायला बैल, कामाला सैल. (खायला ढोकळा, कामाला ठोकळा), (खायला मस्त, कामाला सुस्त).
- खालल्या घरचे वासे मोजणारा.
- खाली मुंडी, पाताळ धुंडी.
- खिळ्यासाठी नाल गेला, नालीसाठी घोडा गेला.
- खिशात नाही आणा अऩ म्हणे मला बाजीराव म्हणा.
- खिशात नाही दमडी, बदलली कोंबडी.
- खुंटीवरचा कावळा ना घरचा ना दारचा.
- खुंट्याची सोडली नि झाडाले बांधली.
- खोट्याच्या कपाळी गोटा.
- गंगा वाहते तोवर हात धुवून घ्यावे.
- गंगेत घोडं न्हालं.
- गरज सरो अऩ वैद्य मरो.
- गरजवंताला अक्कल नसते.
- गरजेल तो पडेल काय?
- गरीबाच्या दाराला सावकाराची कडी.
- गरीबानं खपावं, धनिकाने चाखावं.
- गळा नाही सरी, सुखी निंद्रा करी.
- गळ्यातले तुटले ओटीत पडले.
- गवयाचे मुल सुरांनीच रडणार.
- गांवचा गांव जळे आणि हनुमान बेंबी चोळे.
- गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली.
- गाठ पडली ठकाठका.
- गाढव माजला की तो अखेर आपलेच मुत पितो.
- गाढवं मेलं ऒझ्याने अन शिगरू मेलं हेलपाट्याने. (घोडी मेली ओझ्यानं नि शिंगरू मेलं हेलपाट्यानं.)
- गाढवा समोर वाचली गिता, कालचा गोंधळ बरा होता.
- गाढवाचा गोंधळ लाथाचा सुकाळ.
- गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी.
- गाढवाच्या लग्नांला शेंडीपासून तयारी.
- गाढवाने शेत खाल्ले, पाप ना पुण्य.
- गाढवाला गुळाची चवं काय?
- गाता गळा, शिंपता मळा.
- गाव करी ते राव न करी.
- गाव करील ते राव करील काय?
- गाव तिथे उकिरडा.
- गावंढ्या गावात गाढवी सवाशीण.
- गावात घर नाही रानात शेत नाही.
- गावात नाही झाड अनं म्हणे एरंड्याला आला पाड.
- गुप्तदान महापुण्य.
- गुरवाचे लक्ष निविद्यावर (नैवेद्यावर).
- गुरुची विद्या, गुरुलाच फळली.
- गुलाबाचे कांटे जसे आईचे धपाटे.
- गुळवणी नाहीतर गुळाचार कुठून?
- गुळाचाच गणपती, गुळाचाच नेवैद्य.
- गुळाला मुंगळे चिकटतातच.
- गोगल गाय पोटात पाय.
- गोड बोलून गळा कापणे.
- गोफण पडली तिकडे, गोटा पडला इकडे.
- गोरा गोमटा आणि कपाळ करंटा.
- गोष्ट लहान, सांगण महान.
- गोष्टी गोष्टी आणि मेला कोष्टी.
- गोसाव्याशी झगडा आणि राखाडीशी भेट.
- घटकेत सौभाग्यवती घटकेत गंगा भागीरथी.
- घर गेले विटाळा शेत गेले कटाळा.
- घर चंद्रमोळी पण बायकोला साडीचोळी.
- घर ना दार चावडी बिऱ्हाड. (घर ना दार वाऱ्यावर बिऱ्हाड.)
- घर फिरले की वासेही फिरतात.
- घर साकड नि बाईल भाकड.
- घरचा उंबरठा दारालाच माहीत.
- घरची करती देवा देवा, बाहेरचीला चोळी शिवा.
- घरचे झाले थोडे अऩ व्याहीने धाडले घोडे.
- घरच्याच चिंचेने दात आंबलेत त्यात व्याहयाने धाडलाय वानवळा.
- घरांत नाही दाणा मला बाजीराव म्हणा.
- घराची कळा अंगण सांगते.
- घरात घरघर चर्चा गावभर.
- घरात घाण, दारात घाण, कुठे गेली गोरीपान.
- घरात नाही एक तीळ पण मिशांना देतो पीळ.
- घरात नाही कौल, रिकामा डौल.
- घरात नाही दाणा मला बाजीराव म्हणा.
- घरासारखा गुण, सासू तशी सून.
- घरी नको झालेल्या माणसाला रस्त्यावरची माकडे पण दगड मारतात.
- घरोघरी त्याच परी, सांगेना तीच बरी.
- घरोघरी मातीच्या चुली.
- घाण्याचा बैल.
- घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी.
- घुगऱ्या मुठभर, सारी रात मरमर.
- घुसळतीपेक्षा उकळतीचे घरी अधिक.
- घे सुरी आणि घाल उरी.
- घोंगड अडकलं.
- घोडं झालय मराया बसणारा म्हणतो मी नवा.
- घोडामैदान जवळ असणे.
- घोडे खाई भाडे.
- घोड्यावर हौदा, हत्तीवर खोगीर.
- चढेल तो पडेल.
- चने खाईल लोखंडाचे तेव्हा ब्रम्हपदि नाचे.
- चमडी जाईल पण दमडी जाणार नाही.
- चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही.
- चव ना ढव म्हणे खंडाळ्या पोटभर जेव.
- चांदणे चोराला, उन घुबडाला.
- चांभाराची नजर जोड्यावर.
- चांभाऱ्याच्या देवाला खेटराची पूजा.
- चार आण्याची कोंबडी अऩ बाराण्याचा मसाला.
- चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे.
- चारजनांनी केली शेती, मोत्या ऐंवजी पिकली माती.
- चालत्या गाडीला खीळ घालणे.
- चिंती परा ते येई घरा.
- चिता मेलेल्या माणसाला जाळते, पण चिंता जिवंत माणसाला जाळते.
- चिपट्यात काय काय करू?
- चुकलेला फकीर मशिदीत.
- चुलीतले लाकुड चुलीतच जळाले पाहिजे.
- चुलीपुढं हागायचं आनं नशिबात होत म्हणायच.
- चोंघीजणी सुना पाणी का ग द्याना.
- चोर तो चोर वर शिरजोर.
- चोर नाही तर चोराची लंगोटी.
- चोर सोडून संन्याशाला सुळी.
- चोराच्या उलट्या बोंबा.
- चोराच्या मनांत चांदणं.
- चोराच्या वाटा चोरालाच माहीत.
- चोराच्या हाती जामदाखान्याच्या किल्या.
- चोराला सुटका, आणि गावाला फटका.
- चोरावर मोर.
- चोरीचा मामला हळू हळू बोंबला.
- चोरून पोळी खा म्हटले तर बोंबलून गुळवणी मागायची.
- चोळीला आणि पोळीला कुणी कमी नसते.
- छडी लागे छमछम विद्या येई घमघम.
- जंगलात नाही वावर आणि गावात नाही घर.
- जगाच्या कल्याणा संताची विभुती.
- जनात बुवा आणि मनात कावा.
- जन्मा आला हेला, पाणी वाहता मेला.
- जमता दशमा ग्रह.
- जया अंगी मोठेपणं त्यास यातना कठिण.
- जलात राहून माशाशी वैर कशाला?
- जळतं घर भाड्याने कोण घेणार?
- जशास तसे.
- जशी कामना तशी भावना.
- जशी देणावळ तशी धुणावळ.
- जशी नियत तशी बरकत.
- जसा गुरु तसा चेला.
- जसा भाव तसा देव.
- जाईचा डोळा नि आसवांचा मेळा.
- जातीसाठी खावी माती.
- जात्यातले रडतात, सुपातले हसतात.
- जात्यावर बसले की ओवी सुचते.
- जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही.
- जाळाशिवाय नाही कढ अऩ माये शिवाय नाही रड.
- जावई पाहुणा आला म्हणून रेडा दुध देईल काय?
- जावई माझा भला आणि लेक बाईलबुध्या झाला.
- जावयाचं पोर हरामखोर.
- जावा जावा आणि उभा दावा.
- जावा जावा हेवा देवा.
- जिकडे पोळी तिकडे गोंडा घोळी.
- जिकडे सुई तिकडे दोरा.
- जिच्या घरी ताक तिचे वरती नाक.
- जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाते उध्दारी.
- जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही.
- जिथे कमी तिथे आम्ही.
- जी नाही गोंदणार ती नाही नांदणार.
- जुनं ते सोनं नवं ते हवं.
- जे न देखे रवि ते देखे कवि.
- जे पिंडी ते ब्रम्हांडी.
- जेथे पिकतं तिथे विकतं नाही.
- जेवान जेवाव पंगतीत अन मरान मागावं उमदीत.
- जो गुण बाळा तो जन्म काळा.
- जो नाक धरी, तो पाद करी.
- जो श्रमी त्याला काय कमी.
- जोकून खाणार, कुंथुन हागणार.
- जोवरी पैसा तोवरी बैसा.
- ज्ञान सांगे लोका शेंबुड आपल्या नाका.
- ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी.
- ज्या गावाला जायचे नाही त्य गावचा रस्ता विचारू नये.
- ज्याचं करावं भलं तोच म्हणतो आपलचं खर.
- ज्याचं जळतं त्यालाच कळतं.
- ज्याचं त्याला आणि गाढव वझ्याला.
- ज्याचा त्याला चोप नाही आणि शेजाराला झोप नाही.
- ज्याची करावी चाकरी त्याचीच खावी भाकरी.
- ज्याची दळ त्याचे बळ.
- ज्याचे पदरी पाप त्याला मुली आपोआप.
- ज्याच्या हाती ससा तो पारधी.
- ज्याच्यासाठी लुगडं तेच उघडं.
- ज्याला आहे भाकरी त्याला कशाला चाकरी.
- ज्याला नाही अक्कल त्याची घरोघरी नक्कल.
- ज्वारी पेरली तर गहू कसा उगवणार?
- झगा मगा माझ्याकडे बघा.
- झाकली मुठ सव्वालाखाची.
- झाड जावो पण हाड न जावो.
- झाडाजवळ छाया, बुवाजवळ बाया.
- झाडाला कान्हवले आणि आडात गुळवणी.
- झारीतले शुक्राचार्य.
- झालं गेलं गंगेला मिळालं.
- झोपून हागणार, उठून बघणार.
- टक्केटोणपे खाल्ल्यावाचून मोठेपण येत नाही.
- टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.
- टिटवेदेखील समुद्र आटविते.
- ठकास महाठक.
- ठण ठण पाळ मदन गोपाळ.
- ठिकाण नाही लग्नाला आणि कोण घेते मुलाला.
- ठेवले अनंते तैसेची रहावे.
- ठोसास ठोसा.
- डाग झाला जुना आणि मला प्रतिव्रता म्हणा.
- डाळ शिजत नाही आणि वरण उकळत नाही.
- डोंगर पोखरून उंदीर काढणे.
- डोंगराएवढी हाव, तिळा एवढी धाव.
आभार - PVRSSPR
आपणास अजून म्हणी हव्या असतील तर एक 'म्हणींची संगत शब्दांची रंगत' नावाचे नीलिमा करंदीकर यांनी लिहिलेले पुस्तक आहे! ते जरूर वाचा.
उत्तर द्याहटवाअधिक माहिती:
http://mr.sukrutprakashan.com/home/books/mhaninchi-sangat-shabdanchi-rangat