मराठी म्हणी

  1. "" ची बाधा झाली.
  2. अंगात नाही बळ आणि चिमटा घेउन पळ.
  3. अंगापेक्षा बोंगा जास्ती.
  4. अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज.
  5. अंगावर आल्या गोणी तर बळ धरले पाहिजे टुणी.
  6. अंगावरचे लेणे, जन्मभर देणे.
  7. अंथरूण पाहून पाय पसरावेत.
  8. अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं.
  9. एक पंथ दोन काज.
  10. एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात.
  11. एक पाय मोडल्याने गोम लंगडी होत नाही.
  12. एक पुताची माय वळणीवाटे जीव जाय.
  13. एक पुत्री रडते, सात पुत्री रडते आणि निपुत्री पण रडते.
  14. एक मांसा अन खंडीभर रस्सा.
  15. एक वेळ जेवायचे ताट द्यावे पण पाट देवू नये.
  16. एकटा जिव सदाशिव.
  17. एकमेका सहाय्य करू अवघे धरु सुपंथ.
  18. एका कानाचे दुसऱ्या कानाला कळत नाही.
  19. एका कानाने ऐकावे, दुसऱ्या कानाने सोडून द्यावे.
  20. एका कानावर पगडी, घरी बाईल उघडी.
  21. एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे.
  22. एका माळेची मणी, ओवायला नाही कुणी.
  23. एका म्यानात दोन तलवारी राहात नाहीत.
  24. एका हाताने टाळी वाजत नाही.
  25. एकाची जळते दाढी, दुसरा त्यावर पेटवी बिडी.
  26. एकादशी अनं दुप्पट खाशी.
  27. एकादशीच्या घरी शिवरात्र.
  28. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारु नये.
  29. ऐंक रे भैंऱ्या, आंब्याच्या कैऱ्या.
  30. ऐंकावे जनाचे करावे मनाचे.
  31. ऐंट राजाची अऩ वागणूक कैंकाड्याची.
  32. ऐंशी तिथे पंच्याऐंशी कर ंडे पुरणपोळ्या.
  33. ऐतखा गोसावी, टाळ भैरव बैरागी.
  34. म्हणता ठो येईना.
  35. ओठात एक आणि पोटात एक.
  36. ओठी ते पोटी.
  37. ओल्या बरोबर सुके जळते.
  38. ओळख ना पाळख अनं मला म्हणा लोकमान्य टिळक.
  39. ओसाड गावी एरंडी बळी.
  40. औटघटकेचे राज्य.
  41. औषधावाचून खोकला गेला
  42. औषधावाचून खोकला गेला.
  43. कंबरेचं सोडलं, डोक्याला बांधलं.
  44. कच्च्या गुरुचा चेला.
  45. कठीण समय येता कोण कामास येतो.
  46. कडु कारले तुपात तळले, साखरेत घोळले, कडू ते कडूच.
  47. कण्हती कुथती, मलिद्याला उठती.
  48. कधी गाडीवर नाव, कधी नावेवर गाडी.
  49. कपटि मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा.
  50. कपिलाषष्टीचा योग.
  51. कमळ भुंग्याला अन चिखल बेडकाला.
  52. कर नाही त्याला ड़र कशाला?
  53. करंगळी सुजली म्हणजे डोंगरा एवढी होईल का?
  54. करणी कसायची, बोलणी मालभावची.
  55. करतेस काय वाती अन ऐकतेस काय माती.
  56. करवंदीच्या जाळीला काटे.
  57. करायला गेलो एक अऩ झाले एक.
  58. करायला गेलो एक आणि झाले भलतेच.
  59. करावे तसे भरावे.
  60. करीन ती पूर्व.
  61. करुन करुन भागले अनं देवपुजेला लागले.
  62. करुन गेला गाव आणि कांदळकराचे नाव.
  63. करू गेले काय? अन उलटे झाले काय?
  64. कर्कशेला कलह गोड, पद्मीनीला प्रीती गोड.
  65. कळते पण वळत नाही.
  66. कशात काय अन फाटक्यात पाय.
  67. कशात ना मशात, माकड तमाशात.
  68. कष्ट करणार त्याला देव देणार.
  69. का बा उभी, घरात दोघी तिघी.
  70. काकडीची चोरी, फाशीची शिक्षा.
  71. काका मामांनी भरला गांव, पाणी प्यायला कोठे जाव?
  72. काखेत कळसा अऩ गावाला वळसा.
  73. काजव्याकडून सुर्याची समीक्षा.
  74. काट्याचा नायटा होतो.
  75. काट्याने काटा काढायचा.
  76. काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही.
  77. काडी चोर तो माडी चोर.
  78. कानात बुगडी, गावात फुगडी.
  79. काप गेले आणि भोके राहिली.
  80. काप गेले नि भोका रवली.
  81. काम कवडीचं नाही अनं फुरसत घडीची नाही.
  82. काम धंदा, हरी गोविंदा.
  83. काम ना धाम अनं उघड्या अंगाला घाम.
  84. काम नाही कवडीचं, रिकामपण नाही घडीच.
  85. काम नाही घरी सांडून भरी.
  86. कामापुरता मामा अऩ ताकापुरती आजी.
  87. काय करु अऩ कस करु?
  88. काय बा अशी तु शिकवले तशी.
  89. काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
  90. काळी बेंद्री एकाची, सुंदर बायको लोकाची.
  91. कावळा घातला कारभारी गु आणला दरबारी.
  92. कावळा बसायला आणि फांदी तुटायला.
  93. कावळ्याचे दांत शोधण्यासारखे (मोजण्यासारखे).
  94. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.
  95. कावळ्याने कितीही अंग घासले तरी बगळा होत नाही.
  96. कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते.
  97. काशी केली, गंगा केली, नशिबाची कटकट नाही गेली.
  98. कुंपणच शेत खातय तर जाब विचारायचा कुणाला?
  99. कुंभाराची सून कधीतरी उकिरड्यावर येईलच.
  100. कुठे इंद्राची ऐरावत आणि कुठे शांभाट्टाची तट्टानी.
  101. कुठे जाशी भोगा तर तुझ्या पाठी उभा.
  102. कुठे तरी पाल चुकचुकतेय.
  103. कुठेही जा, पळसाला पाने तीनच.
  104. कुडास कान ठेवी ध्यान.
  105. कुडी तशी पुडी.
  106. कुणाचा कुणाला पायपूस नाही.
  107. कुणाची म्हैस, कुणाला ऊठबैस.
  108. कुणाला कशाचे बलुत्याला पशाचे.
  109. कुणी वंदा, कुणी निंदा, माझा स्वहिताचा धंदा.
  110. कुत्र्या मांजराचे वैर.
  111. कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच.
  112. कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ.
  113. कुसंतनापेक्षा निसंतान बरे.
  114. केला जरी पोत बरेच खाली, ज्वाळा तरी ते वर उफाळी.
  115. केल्याने होत आहे आधी केले ची पाहिजे.
  116. केळी खाता हरकले, हिशेब देता टरकले.
  117. केळीवर नारळी अन घर चंद्रमोळी.
  118. केळ्याचा डोंगर, दे पैशाचा डोंगर.
  119. केवड्याने दान वाटले आणि गावात नगारे वाजले.
  120. कोंड्याचा मांडा करुन खाणे.
  121. कोंबडे झाकले म्हणून उजडायचे राहत नाही.
  122. कोणाला कशाचं तर बोड्कीला केसाचं. (कोणाला कशाचे मळणीला लसणाचे.)
  123. कोल्हा काकडीला राजी.
  124. कोल्ह्यास द्राक्षे आंबट.
  125. कोळसा कितीही उगाळला तरी काळाच.
  126. क्रियेवण वाचळता व्यर्थ आहे.
  127. खतास महाखत.
  128. खऱ्याचं खोटं अन लबाडाचं तोंड मोठं.
  129. खऱ्याला मरण नाही.
  130. खा त्याला खवखवे.
  131. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी.
  132. खा जाणे तो पचवू जाणे.
  133. खाऊन माजावे पण टाकून माजू नये.
  134. खाजवुन अवधान आणणे.
  135. खाजवुन खरुज काढणे.
  136. खाटकाला शेळी (गाय) धार्जिणी.
  137. खाण तशी माती.
  138. खाणाऱ्याचे खपते, कोठाराचे पोट दुखते.
  139. खाणाऱ्याला चव नाही, रांधणाऱ्याला फुरसत नाही.
  140. खाणे खाण्यातले आणि दुखणे पहिल्यातले.
  141. खाणे बोकडासारखे आणि वाळणे लाकडासारखे.
  142. खातीचे गाल आणि न्हातीचे बाल लपत नाहीत.
  143. खादाड खा लांडग्याचा भा.
  144. खायचे दांत वेगळे, दाखवायचे वेगळे.
  145. खायला आधी, निजायला मधी आणि कामाला कधी.
  146. खायला कहर आणि भुईला भार.
  147. खायला कोंडा अऩ निजायला धोंडा.
  148. खायला बैल, कामाला सैल. (खायला ढोकळा, कामाला ठोकळा), (खायला मस्त, कामाला सुस्त).
  149. खालल्या घरचे वासे मोजणारा.
  150. खाली मुंडी, पाताळ धुंडी.
  151. खिळ्यासाठी नाल गेला, नालीसाठी घोडा गेला.
  152. खिशात नाही आणा अऩ म्हणे मला बाजीराव म्हणा.
  153. खिशात नाही दमडी, बदलली कोंबडी.
  154. खुंटीवरचा कावळा ना घरचा ना दारचा.
  155. खुंट्याची सोडली नि झाडाले बांधली.
  156. खोट्याच्या कपाळी गोटा.
  157. गंगा वाहते तोवर हात धुवून घ्यावे.
  158. गंगेत घोडं न्हालं.
  159. गरज सरो अऩ वैद्य मरो.
  160. गरजवंताला अक्कल नसते.
  161. गरजेल तो पडेल काय?
  162. गरीबाच्या दाराला सावकाराची कडी.
  163. गरीबानं खपावं, धनिकाने चाखावं.
  164. गळा नाही सरी, सुखी निंद्रा करी.
  165. गळ्यातले तुटले ओटीत पडले.
  166. गवयाचे मुल सुरांनीच रडणार.
  167. गांवचा गांव जळे आणि हनुमान बेंबी चोळे.
  168. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली.
  169. गाठ पडली ठकाठका.
  170. गाढव माजला की तो अखेर आपलेच मुत पितो.
  171. गाढवं मेलं ऒझ्याने अन शिगरू मेलं हेलपाट्याने. (घोडी मेली ओझ्यानं नि शिंगरू मेलं हेलपाट्यानं.)
  172. गाढवा समोर वाचली गिता, कालचा गोंधळ बरा होता.
  173. गाढवाचा गोंधळ लाथाचा सुकाळ.
  174. गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी.
  175. गाढवाच्या लग्नांला शेंडीपासून तयारी.
  176. गाढवाने शेत खाल्ले, पाप ना पुण्य.
  177. गाढवाला गुळाची चवं काय?
  178. गाता गळा, शिंपता मळा.
  179. गाव करी ते राव करी.
  180. गाव करील ते राव करील काय?
  181. गाव तिथे उकिरडा.
  182. गावंढ्या गावात गाढवी सवाशीण.
  183. गावात घर नाही रानात शेत नाही.
  184. गावात नाही झाड अनं म्हणे एरंड्याला आला पाड.
  185. गुप्तदान महापुण्य.
  186. गुरवाचे लक्ष निविद्यावर (नैवेद्यावर).
  187. गुरुची विद्या, गुरुलाच फळली.
  188. गुलाबाचे कांटे जसे ईचे धपाटे.
  189. गुळवणी नाहीतर गुळाचार कुठून?
  190. गुळाचाच गणपती, गुळाचाच नेवैद्य.
  191. गुळाला मुंगळे चिकटतातच.
  192. गोगल गाय पोटात पाय.
  193. गोड बोलून गळा कापणे.
  194. गोफण पडली तिकडे, गोटा पडला इकडे.
  195. गोरा गोमटा आणि कपाळ करंटा.
  196. गोष्ट लहान, सांगण महान.
  197. गोष्टी गोष्टी आणि मेला कोष्टी.
  198. गोसाव्याशी झगडा आणि राखाडीशी भेट.
  199. घटकेत सौभाग्यवती घटकेत गंगा भागीरथी.
  200. घर गेले विटाळा शेत गेले कटाळा.
  201. घर चंद्रमोळी पण बायकोला साडीचोळी.
  202. घर ना दार चावडी बिऱ्हाड. (घर ना दार वाऱ्यावर बिऱ्हाड.)
  203. घर फिरले की वासेही फिरतात.
  204. घर साकड नि बाईल भाकड.
  205. घरचा उंबरठा दारालाच माहीत.
  206. घरची करती देवा देवा, बाहेरचीला चोळी शिवा.
  207. घरचे झाले थोडे अऩ व्याहीने धाडले घोडे.
  208. घरच्याच चिंचेने दात आंबलेत त्यात व्याहयाने धाडलाय वानवळा.
  209. घरांत नाही दाणा मला बाजीराव म्हणा.
  210. घराची कळा अंगण सांगते.
  211. घरात घरघर चर्चा गावभर.
  212. घरात घाण, दारात घाण, कुठे गेली गोरीपान.
  213. घरात नाही एक तीळ पण मिशांना देतो पीळ.
  214. घरात नाही कौल, रिकामा डौल.
  215. घरात नाही दाणा मला बाजीराव म्हणा.
  216. घरासारखा गुण, सासू तशी सून.
  217. घरी नको झालेल्या माणसाला रस्त्यावरची माकडे पण दगड मारतात.
  218. घरोघरी त्याच परी, सांगेना तीच बरी.
  219. घरोघरी मातीच्या चुली.
  220. घाण्याचा बैल.
  221. घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी.
  222. घुगऱ्या मुठभर, सारी रात मरमर.
  223. घुसळतीपेक्षा उकळतीचे घरी अधिक.
  224. घे सुरी आणि घाल उरी.
  225. घोंगड अडकलं.
  226. घोडं झालय मराया बसणारा म्हणतो मी नवा.
  227. घोडामैदान जवळ असणे.
  228. घोडे खा भाडे.
  229. घोड्यावर हौदा, हत्तीवर खोगीर.
  230. चढेल तो पडेल.
  231. चने खाईल लोखंडाचे तेव्हा ब्रम्हपदि नाचे.
  232. चमडी जाईल पण दमडी जाणार नाही.
  233. चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही.
  234. चव ना ढव म्हणे खंडाळ्या पोटभर जेव.
  235. चांदणे चोराला, उन घुबडाला.
  236. चांभाराची नजर जोड्यावर.
  237. चांभाऱ्याच्या देवाला खेटराची पूजा.
  238. चार आण्याची कोंबडी अऩ बाराण्याचा मसाला.
  239. चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे.
  240. चारजनांनी केली शेती, मोत्या ऐंवजी पिकली माती.
  241. चालत्या गाडीला खीळ घालणे.
  242. चिंती परा ते ये घरा.
  243. चिता मेलेल्या माणसाला जाळते, पण चिंता जिवंत माणसाला जाळते.
  244. चिपट्यात काय काय करू?
  245. चुकलेला फकीर मशिदीत.
  246. चुलीतले लाकुड चुलीतच जळाले पाहिजे.
  247. चुलीपुढं हागायचं आनं नशिबात होत म्हणायच.
  248. चोंघीजणी सुना पाणी का द्याना.
  249. चोर तो चोर वर शिरजोर.
  250. चोर नाही तर चोराची लंगोटी.
  251. चोर सोडून संन्याशाला सुळी.
  252. चोराच्या उलट्या बोंबा.
  253. चोराच्या मनांत चांदणं.
  254. चोराच्या वाटा चोरालाच माहीत.
  255. चोराच्या हाती जामदाखान्याच्या किल्या.
  256. चोराला सुटका, आणि गावाला फटका.
  257. चोरावर मोर.
  258. चोरीचा मामला हळू हळू बोंबला.
  259. चोरून पोळी खा म्हटले तर बोंबलून गुळवणी मागायची.
  260. चोळीला आणि पोळीला कुणी कमी नसते.
  261. छडी लागे छमछम विद्या येई घमघम.
  262. जंगलात नाही वावर आणि गावात नाही घर.
  263. जगाच्या कल्याणा संताची विभुती.
  264. जनात बुवा आणि मनात कावा.
  265. जन्मा आला हेला, पाणी वाहता मेला.
  266. जमता दशमा ग्रह.
  267. जया अंगी मोठेपणं त्यास यातना कठिण.
  268. जलात राहून माशाशी वैर कशाला?
  269. जळतं घर भाड्याने कोण घेणार?
  270. जशास तसे.
  271. जशी कामना तशी भावना.
  272. जशी देणावळ तशी धुणावळ.
  273. जशी नियत तशी बरकत.
  274. जसा गुरु तसा चेला.
  275. जसा भाव तसा देव.
  276. जाईचा डोळा नि आसवांचा मेळा.
  277. जातीसाठी खावी माती.
  278. जात्यातले रडतात, सुपातले हसतात.
  279. जात्यावर बसले की ओवी सुचते.
  280. जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही.
  281. जाळाशिवाय नाही कढ अऩ माये शिवाय नाही रड.
  282. जाव पाहुणा आला म्हणून रेडा दुध देईल काय?
  283. जाव माझा भला आणि लेक बाईलबुध्या झाला.
  284. जावयाचं पोर हरामखोर.
  285. जावा जावा आणि उभा दावा.
  286. जावा जावा हेवा देवा.
  287. जिकडे पोळी तिकडे गोंडा घोळी.
  288. जिकडे सु तिकडे दोरा.
  289. जिच्या घरी ताक तिचे वरती नाक.
  290. जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाते उध्दारी.
  291. जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही.
  292. जिथे कमी तिथे आम्ही.
  293. जी नाही गोंदणार ती नाही नांदणार.
  294. जुनं ते सोनं नवं ते हवं.
  295. जे देखे रवि ते देखे कवि.
  296. जे पिंडी ते ब्रम्हांडी.
  297. जेथे पिकतं तिथे विकतं नाही.
  298. जेवान जेवाव पंगतीत अन मरान मागावं उमदीत.
  299. जो गुण बाळा तो जन्म काळा.
  300. जो नाक धरी, तो पाद करी.
  301. जो श्रमी त्याला काय कमी.
  302. जोकून खाणार, कुंथुन हागणार.
  303. जोवरी पैसा तोवरी बैसा.
  304. ज्ञान सांगे लोका शेंबुड आपल्या नाका.
  305. ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी.
  306. ज्या गावाला जायचे नाही त्य गावचा रस्ता विचारू नये.
  307. ज्याचं करावं भलं तोच म्हणतो आपलचं खर.
  308. ज्याचं जळतं त्यालाच कळतं.
  309. ज्याचं त्याला आणि गाढव वझ्याला.
  310. ज्याचा त्याला चोप नाही आणि शेजाराला झोप नाही.
  311. ज्याची करावी चाकरी त्याचीच खावी भाकरी.
  312. ज्याची दळ त्याचे बळ.
  313. ज्याचे पदरी पाप त्याला मुली आपोआप.
  314. ज्याच्या हाती ससा तो पारधी.
  315. ज्याच्यासाठी लुगडं तेच उघडं.
  316. ज्याला आहे भाकरी त्याला कशाला चाकरी.
  317. ज्याला नाही अक्कल त्याची घरोघरी नक्कल.
  318. ज्वारी पेरली तर गहू कसा उगवणार?
  319. झगा मगा माझ्याकडे बघा.
  320. झाकली मुठ सव्वालाखाची.
  321. झाड जावो पण हाड जावो.
  322. झाडाजवळ छाया, बुवाजवळ बाया.
  323. झाडाला कान्हवले आणि आडात गुळवणी.
  324. झारीतले शुक्राचार्य.
  325. झालं गेलं गंगेला मिळालं.
  326. झोपून हागणार, उठून बघणार.
  327. टक्केटोणपे खाल्ल्यावाचून मोठेपण येत नाही.
  328. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.
  329. टिटवेदेखील समुद्र आटविते.
  330. ठकास महाठक.
  331. ठण ठण पाळ मदन गोपाळ.
  332. ठिकाण नाही लग्नाला आणि कोण घेते मुलाला.
  333. ठेवले अनंते तैसेची रहावे.
  334. ठोसास ठोसा.
  335. डाग झाला जुना आणि मला प्रतिव्रता म्हणा.
  336. डाळ शिजत नाही आणि वरण उकळत नाही.
  337. डोंगर पोखरून उंदीर काढणे.
  338. डोंगराएवढी हाव, तिळा एवढी धाव.
‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ ‌‌‌‌‌ ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌

आभार - PVRSSPR

टिप्पण्या

  1. आपणास अजून म्हणी हव्या असतील तर एक 'म्हणींची संगत शब्दांची रंगत' नावाचे नीलिमा करंदीकर यांनी लिहिलेले पुस्तक आहे! ते जरूर वाचा.
    अधिक माहिती:
    http://mr.sukrutprakashan.com/home/books/mhaninchi-sangat-shabdanchi-rangat

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा