चारोळी संग्रह..

Sea foam.Image via Wikipedia1) त्या येऊन जाणा-या लाटेशी
या बिचा-या किना-यानं कसं वागावं..?
ती परकी नसली तरी त्यानं
तिला आपलं कसं मानावं..?

2) कितीही म्हटलं तरी,
मला तितकसं व्यवहारीपणे वागता येत नाही..,
आभाळावर केलेल्या त्या बेहिशोबी प्रेमाचं
या चातकाला व्याज मागता येत नाही.

3) बंद घरात बंद तो चिमणा,
काचेच्या खिडकीवर झडपा मारत होता...
प्रेमासाठी आसुसलेला तो
स्वत्ताची रक्तबंबाळ चोचही विसरत होता.

4) काही नाती अमुल्य असतात
त्यांची किंमत करू नये
जपावं हाताच्या फोड्यासारखं
उगाचचं गंमत करू नये

5) तुझ्या आठवणीत मी जगतो,
असं मी कधीच म्हणणार नाही.
कारण आठवण्यासाठी मुळात,
मी तुला कधी विसरतच नाही.

6) पहिल्यांदा बोललीस,
आणि घाबरुनच गेलीस.
पुन्हा एकदा बोललीस,
आणि कायमची विरघळलीस.

7) कितीही ठरवलं तरी
तुझ्यावर रुसून राहता येत नाही...,
उघड्या डोळ्यांनी तूला टाळलं तरी
मिटल्यावर त्यांना तुझ्याशिवाय पर्याय उरत नाही..

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

टिप्पण्या