एक होता विदुषक , नाव त्याचं लक्ष्या..

The first ever Marathi klipImage by Mskadu via Flickr

शांतेचं कार्ट चालू आहे
हा बसला ज्याच्यावर ठपका
मग,चल रे लक्ष्या मुंबईला म्हणत
धुमधडाका ज्याने केला..
हसवलं त्यानं जगाला
बोलक्या डोळ्यांनी,मिश्किल हास्याने
अफलातून बोलांनी,चुलबुल्या स्वभावाने
मोहवलं त्यानं मनाला..

शुभ बोल ना-या म्हणत
सा-यांनी त्याच्यापुढे रगडला माथा
पण त्यानं धांगडधिंगा करत
गडबड घोटाळ्याचा शेजार नाही सोडला..
दे दणादण करत
मारलं त्यानं खलनायकांना
प्रेम करुया खुल्लमखुल्ला म्हणतं
जिंकलं त्यानं प्रेमिकांना..

नायिकेच्या बापापुढे करे तो थरथराट
बनवा बनवी करणा-यांसाठी असे तो खतरनाक
बचतीचे धडे देणारा होता तो चिकट नवरा
बहिणीसाठी विघ्नहर , हाच सूनबाईचा भाऊ होता..
रंगत संगतीनं ह्याच्या जो तो रंगलेला
मस्करीने त्याच्या रसिक झपाटलेला..

पण नियतीने कथेचा सापळा असा रचला
धडाकेबाज विदूषकाचा रोल तिनं काटला..
पण, बजरंगाची कमाल बघा
नियतीलाही बेट्याने हरवला..

अरे, रडवून ' जाईल ' तो विदूषक कसला ?
पडद्यावरून मनात उतरुन..
मनमुराद हसवत सर्वांना
लक्ष्या तर अमर झालेला..
लक्ष्या अमर झालेला..

इ-मेल फॉरवर्ड - आभार: कवि/ लेखक
Reblog this post [with Zemanta]

टिप्पण्या