जीवन - एक परिवर्तन...! [Change is life - Marathi Poem]

Juvenile Monarch Butterfly LarvaImage by OakleyOriginals via Flickr

मी आहे, तू आहेस आज परिवर्तनामुळे
कारण...
रोज सूर्योदय होतो , तो एक परिवर्तन घेऊन
रोज सूर्यास्त होतो , तो एक इतिहास पचवून
बाल्यावस्था ते युवावस्था , युवावस्था ते वृद्धावस्था
हा परिणाम साध्य होतो परिवर्तनानेच

प्राचिनतेतून आधुनिकता, तंत्र-तंत्रात आधुनिकता
हा परिणाम साध्य होतो परिवर्तनानेच
ब्रह्मांडात असे काय ते महामृत्युंजय
परंतु परिवर्तन काय ते अजेय

दु:खातून सुखाकडे , अश्रुतून स्मिताकडे
प्रकाशतून तमाकडे अन् तमातून प्रकाशाकडे
हा ही परिणाम साध्य झाला तो परिवर्तनानेच
उद्धार असो संसाराचा अथवा पतन
कितीही करा तुम्ही जतन
अहो...


अहो..परिवर्तनच करेल त्याचं कर्तन .
म्हणून ...
या विश्वात एकच आणि एकच गोष्ट आहे चिरंतन,
परिवर्तन , परिवर्तन ! परिवर्तन !!
........................................चंद्रकांत साव

Reblog this post [with Zemanta]

टिप्पण्या