दु:ख याचं कधीच वाटलं नाही की...

Hugo Simberg's The Wounded Angel.Image via Wikipediaदु:ख याचं कधीच नव्हतं,
परक्यांनी खुप वेळा झिडकारलं,
टोचणी याची आजही लागली की,
नात्यांनीच अनेक वेळा फटकारलं!

दु:ख याचं कधीच वाटलं नव्हतं की,
इतरांनी खुप वेळा निंदा केली,
कंत इतकीच कुठेतरी सलत राहिली की,
घरच्यांनीच आपली खुप शोभा केली...!

दु:ख याचं कधीच वाटलं नव्हतं की,
अनेक वेळा माझा विश्वासघात केला,
दु:ख फक्क्त याचं वाटलं की,
कुणीतरी आपल्यानेच विश्वासघातकी ठरवला..!

दु:ख याचं कधीच वाटलं नव्हतं की,
मजवर कोणी विश्वास नाही केला
सल फक्त एवढीच कुठेतरी राहिली की,
सगळ्यांनीच मजसाठी विषाचा पेला तयार केला..!

दु:ख याचं कधीच वाटलं नाही की,,
आयुष्यात कधी दिवाळी आली नाही,
खंत एकच मनात कुठेतरी दडली की,
जवळच्यांनीच माझ्या आयुष्याची होळी पेटवली..!

दु:ख याचं कधीच वाटलं नाही की,
कुणी माझे गुण नाही पारखले,
सल मनात एकच कुढू लागली की,
जवळच्यांनीच माझ्यात खुप दोष बघितले..!

दु:ख याचं कधीच वाटलं नाही की,
कधी कुणी माझ्यावर प्रेम नाही केले,
टोचणी फक्त एकच लागुन राहिली की,
का फक्त माझ्यासाठीच तिरस्काराचे पेले..!

दु:ख याचं कधीच वाटलं नाही की,
एका जीवंत माणसाचे रुपांतर प्रेतात झाले,
टोचणी फक्त एवढीच लागुन राहिली की,
एका महान आत्म्याचे भुतात रुपांतर झाले...!



Name: Nitin Salvi
Email:niteensalvee[at]gmail.com
Mob: ९८९२०१९९०२
Reblog this post [with Zemanta]

टिप्पण्या