Image via Wikipediaतुझ्यावर खुप दिवसांपासुन लिहायचे म्हणतो
पण तुझ्यासाठी शब्दच सापडत नाहीत
तुझा विषय निघाला की शब्द हरवतात
कारण तेंव्हा मी, मी नसतो.. आसमंतात तुला शोधत भरकटत असतो....
पण नेहमीप्रमाणे निराशा होते
हातातली सिगारेट पुन्हा भानावर आणते
तु नसुनही कायम बरोबर असते
सुखदु:खाच्या हर एक क्षणी खांद्याला खांदा लावुन असते
आनंदाच्या वेळी तुझा बेभानपणा भासतो
निराश मनाची समजुत काढणारी तुच असते
तुझी प्रतिमा मी रोज रंगवत असतो
तुझ्याशी मी रोज बोलतही असतो
थट्टा, मस्करी आणि भांडणही होते
तरीही तु कोण आहेस? कुठे आहेस? कशी आहेस?
एक ना अनेक प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत ...
पण एक दिवस तु समोर येणार आणि
तेंव्हा मात्र शब्दांचा पाऊस मुसळधार बरसणार..!!
............................... कवि - निनावी
काय सांगता ... लिखान आवडले?
मग आम्हाला अभिप्राय लिहा , मित्रांना हे लिखान पाठवा किंवा ट्विटला पाठवा !तुमच्या सुचना - अभिप्राय
तुम्ही तुमच्या ई-मेल वरही हे लिखान मागवु शकता.
![Reblog this post [with Zemanta]](http://img.zemanta.com/reblog_e.png?x-id=c193d0a1-9db4-4f2c-9189-0870b8a14d62)





0 comments:
Post a Comment