सर्प ( Marathi article- Snake)

Red milk snake (Lampropeltis triangulum syspil...
Red milk snake (Lampropeltis triangulum syspila) User licence kindly provided to Wikipedia under the GFDL by photographer: Mike Pingleton Mike's page (Photo credit: Wikipedia)
सर्प म्हटला की अनेकांच्या अंगावर शहारे तर भीती येते परंतु खोपोली शहरातील सर्प  संवर्धन या संघटनेने सापांच्या विविध जातींचे छायाचित्र प्रदर्शन भरविले असून सापांविषयी माहिती व नागरिकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्याचा प्रयत्न या प्रदर्शनाच्या माध्यमातून केला जात आहे शहरातील लोहाना समाज सभागृहात मंगळवार आणि बुधवार दोन दिवस सापांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविले असून यामध्ये विषारी, निम विषारी  आणि बिन विषारी सापांचे छायाचित्र व त्यांची माहिती प्रदर्शनाच्या माधमातून शाळकरी विद्यार्थी, महिला व नागरिक व प्राणीप्रेमीपर्यंत पोहोचविण्याचा एक स्तुत्त्य उपक्रम राबविला आहे.

28 सर्प जातींची माहिती लेखी स्वरुपात लावण्यात आली आहे.  यामध्ये 18 जाती या बिन विषारी असून यामध्ये डुरक्या घोणस, वाळा, खापर खपल्या, मांडूल, अजगर आदींचा समावेश असून निम विषारीमध्ये श्वान मुखी सर्प, हरण तोल, मांजर्या, चिलांग सर्प तर विषारी सापांमध्ये नाग, घोणस, फुरसे, मणेर, रात सर्प, समुद्र सर्प, किंग कोब्रा आदी जातींचा समावेश होत असल्याने या सर्व सापांच्या विषयी उपयुक्त महिती देत सापांबाबत नागरिकांमध्ये असणारे भीतीचे वातावरण तर समाज गैरसमज हे दूर करून साप माणसाचा मित्र कसा होऊ शकतो याबाबत प्रदर्शनाचे आयोजक सर्पमित्र रोशन पालांडे, योगेश शिंदे,  मंगेश घोडके, प्रदीप कुलकर्णी, अरविंद गुरव, संजय केळकर यांनी सांगत निम विषारी सर्प यांचे विष बेडूक, उंदीर, पाल असे लहान प्राणी बेशुद्ध होतील एवढेच विष त्यांच्यामध्ये  असते म्हणजेच माणसासाठी हे निम विषारी सर्प  बिन विषारीच असतात तर बिन विषारी सर्प विटा ग्रंथी नसल्याने विषबाधेचा संबंध नसतो अशी माहिती आयोजकांनी दिली .

विशेष म्हणजे अजगर या सापाला हुमन बॉडी टेम्प्रेचर सेन्स असल्याने तो मानवावर हल्ला करतो मात्र नागासारख्या प्राण्याला हा सेन्स नसल्याचा खुलासा आयोजकांनी या निमित्ताने केला आहे .

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

टिप्पण्या