मी मराठी

प्रपोज केल्यानंतर .....

two birds
two birds (Photo credit: McBeth)
प्रपोज केल्यानंतर "मुलीकडून साधारणता" कोणती उत्तरे" मिळू शकतात त्याबद्दल
काही....

१. नाही sssssss

२. शी . किती घाणेरडे विचार आहेत तुझे ?

३. मी तर तुला ' तसल्या नजरेने' पाहिलेच नाही ... मी तुला फक्त एक चांगला
[ हे अजून वर ] दोस्त मानते ...

४. मी "ऑलरेडी एंगेज" आहे.

५. प्लीज, माझा असल्या "फालतू गोष्टींवर" विश्वास नाही. माझ्यासाठी माझे '
शिक्षण, करियर व कुटुंबिय' महत्त्वाचे आहेत....

६. आपली तर आत्ता कुठे चांगली ओळख झाली आहे, तु तर मला अजून व्यवस्थीत ओळखत
पण नाहीस, मला वाटतं की हे कदाचित "आकर्षण" असावे ...

७. तु किती कमावतोस ? / तुझा बॅलेंस किती आहे?

८. मागच्या वर्षीच तर मी तुला "राखी" बांधली होती !!!!

९. माझी अशा गोष्टींसाठी अजून 'मानसीक तयारी' झाली नाही ....

१०. मी माझ्या आईला / दादाला विचारून सांगते ....( बाबांपर्यंत नको ) { नंतर
काहीच नाही .....}

११. मुर्ख , एवढी छोटीसी आणि महत्त्वाची गोष्ट सांगायला येवढा उशिर करतात का ?

१२. मला माहित आहे. बोलुन दाखवण्याची गरज नाही ....

१३. सॉरी ....

१४. "आरश्यात तोंड बघ मेल्या ... म्हणे तू मला आवडतेस !!!"

१५. मी तर तुला भावासमान मानते [ पण मी मानत नाही ना !!! ]

१६. होय, मला पण तू आवडतोस , पण तू माझा विश्वासघात करणार नाहिस ना ?

१७. गाढवा, आधिच नाहीस का सांगायचं, आता वेळ निघून गेली [ म्हणजे दुसरे
कोणतेतरी चांगले "गाढव" सापडले ]

१८. तु जर थोडे आधी सांगितले असते तर मी कदाचित विचार केला असता ....

१९. नालायका , तुझी हिंम्मत कशी झाली मला असे विचारायची ?" [ त्यानंतर कदाचित
एक छानशी कानफाडीत ...]

२०. ती : मला विचार करायला वेळ हवा आहे ...
तो : नक्की किती ? [ अजून आशा आहे तर ....]
 ती : ७ जन्म .... [ यानंतर मुलगा बेशुद्ध ...]

२१. नीच माणसा, मी तर एक "विवाहित स्त्री" आहे तरीपण ....

२२. सॉरी , माझे तुझ्या मित्रावर / छोट्या भावावर प्रेम आहे ....

२३. हा हा....हा हा हा.... हा हा हा हा ही ही ... ही ही ही ... ही ही ही ही

२४. लग्नाच्या आधी माझा असल्या कुठल्याही फालतू गोष्टीत गुंतण्याचा विचार
नाही....

२५. मातीत जा ... मला त्याची पर्वा नाही ....

२६. तु माझ्यासाठी काय करू शकसिल ?

२७. मी कितवी आहे? हा हा हा ....

२८. मी तुझ्याबद्दल "तसला विचार' कधी केलाच नाही ...

२९. माझ्या भावाला भेट, तो तुला व्यवस्थित समजावून सांगेल....

३०. का ??? "स्वाती" नाही म्हणली का?

३१. पण तू तर "सपना च्या" मागे होतास , तिने काय थप्पड वगैरे मारली का ?

३२. किती दिवसांकरता ? सॉरी किती तासांकरता ?

३३. " जे काही बोलायचे आहे ते लवकर बोलुन टाक, माझ्या मुलाची शाळेतून
येण्याची वेळ झाली आहे..."

३४. कित्तीssss छान ....

३५. पुढच्या ४ महिन्यांची 'वेटिंग लिस्ट ' पन फुल्ल आहे ...

३६. क्काय sssss

३७. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा नाहितर ....

३८. मला वटतयं कदाचित मी "एंगेज" असेन ...

३९. मझ्याकडे तुझ्यापेक्षा जास्त चांगले "ऑप्शन" आहेत...

४०. मला ह्या गोष्टीबद्दल काहिएक बोलायची इच्छा नाही. त्यानंतर ती
त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागते .....

 ४१. माझ्या "बॉयफ्रेंडला" कळले तर

-- Mr. Yogesh Madhukar Sawant.
Mob. 9221716915 / 9867627235

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

४ टिप्पण्या:

 1. प्रिय योगेश
  तुम्ही मुलींच्या ४१ संभाव्य उत्तरांची दिलेली यादी
  पाहून प्रपोज करणाऱ्या मुलाने ४१ वेग वेगळ्या मुलीना तर
  प्रपोज केले नसावे?

  मुली बद्दल चा होम वर्क मस्त आहे.खास करून ३० ३१ ३५ ३९ व ४१ ही उत्तरे लय झकास.

  उत्तर द्याहटवा
 2. Kharya premala akarshan naste.
  Saglyat imp premachi vyakya samjayla havi.

  उत्तर द्याहटवा

Popular Articles

Heart (Photo credit: mozzercork ) नवरदेवाचे उखाणे... १) संसारातल्या संकटांची नाही पर्वा आता साथ आहे माझ्याबरोबर ......कांता !!!!! ...
मैत्री [Maitree - Friendship - Marathi Poem]
Image via Wikipedia मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय... गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस सोय म्हणून सहज असं तोडू नकोस.. र...
श्री स्वामी समर्थ [Shree Swami Samarth]
Shri Swami Samartha Maharaj, Akkalkot. (Photo credit: Wikipedia ) श्री स्वामी समर्थ आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतराजीत प्राचीन काळा...
Image by mundo resink via Flickr मलाही वाटते नाते असावे मलाही कुणि आपले असावे पण मग एकच गोष्ट माझ्या मनात येते.... आलो असेच आणि जाणारही अ...
पहिला पाऊस .. [The First Rain - Marathi Poem ]
Image via Wikipedia पहिला पाऊस पडतो तेंव्हा पहिला पाऊस पडतो तेंव्हा एकच काम करायचं... हातातली कामं टाकुन देउन पावसात जाऊन भिजायचं! आपल्या अ...
roses (Photo credit: Robert Couse-Baker ) रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं.. ...हातात हात धरुन...