मी मराठी

वट सावित्री पौर्णिमा

English: Banyan tree in Bharat Vaina, Jessore,...
English: Banyan tree in Bharat Vaina, Jessore, Bangladesh বাংলা: বটগাছ (Photo credit: Wikipedia)
वट सावित्री पौर्णिमा आणि पर्यावरणाचा विचार पूर्वजांची दृष्टी , द्रष्टेपण आणि आपण .

वटपौर्णिमा आणि वडाचे झाड ह्या दोन अन्योन्यसंबंध असलेल्या बाबी. पण ह्याबाबत
आज कोण जाणून घेऊ इच्छिते?
आपल्याला त्यामागील तत्त्व समजून घेऊन काही करायचे असेल तर छानच. पण किमान
त्याबद्दल काही जाणून घेणे ही पहिली पायरी तर चढू या.
वड, पिंपळ, उंबर ही झाडे हिंदू धर्मात पवित्र मानतात. तोडू नये असे निक्षून
म्हणतात. तोडल्यास भीतीदायक परिणाम सांगितले जातात, पूर्वापार. मुंजा , हडळ,
समंध त्यावर राहतात अशीही भीती दाखवली जाते.
ह्यामागे आपल्या पूर्वजांची दूरदृष्टी, जागरूकता येण्यासाठीचा फार मोठा
पर्यावरणीय संदेश आहे.असे मला वाटते.
आधी आपण उत्तरार्ध बघू , म्हणजे वडाची लागवड आणि वटपौर्णिमेला पूजेसाठी
तोडल्या जाणाऱ्या फांद्या...
ह्याबाबत यंदा जास्तच जागरूकता दिसते आहे आणि त्यावर अनेक कॉपी पेस्टचे पीकच
पिक आलेले दिसतेय. जागृती आणि पर्यावरण विचार होणे उत्तमच आहे. पण ह्याच
जाडसर् जून ४-५ फुटी फांद्या थेट जमिनीत अथवा जून पण लहान फांद्या मोठ्याशा
कुंडीत लावून , मोठ्या थैलीत लावून त्यांचा सदुपयोग करता येईल.
. अशा फांद्या रुजतात. त्याची झाडे बनतात. नक्की. .फक्त रुजल्यावर ४-५ वर्षे
त्यांच्या जगण्यासाठी थोडीशी देखभाल लागते. मग पृथ्वीवरील हरित आच्छादन म्हणून
जमिनीत कुठेही लावली असली तरी ती जगतातच.

हे वटवृक्ष प्राणवायूचे सघन स्रोत आहेत. म्हणून पर्यावरणातील आवश्यक घटक.
परवाच्या केदारनाथच्या दुर्घटनेचा आठव आणि त्या निमित्ताने एक आठवण
बाल मुकुंद वडाच्या पानावर खेळताना , पहुडलेला का मानतात?
प्रलयात वटवृक्षाचे उन्मूलन होत नाही, तो अचल राहतो .म्हणून त्याच्या पानावर
बाळकृष्ण हा एक संकेत आणि सांकेतिक अर्थ आहे.

हे वडाचे झाड शतकानुशतके जगते. पुनरुज्जीवित होते. त्याच्या अफाट पसरलेल्या
भक्कम मुळांमुळे ती माती धरून ठेवतात. पूर आणि जमिनीची धूप रोखतात.
इतर लाभ
पक्षांचा अधीवास.त्यामुळे कीटक नियंत्रण , परागीभवन ,विष्ठेतून बीजे रुजण्याने
नैसर्गिक वनीकरण, समृद्ध जीव विविधता आणिप्राणी सृष्टीतील परस्परांवलम्बनइ.
अनेक हेतू साधतात.

वडाचे झाड जमिनीत ओलावा धरून ठेवते. आणि पानातून वातावरणात सोडते. त्यामुळे
वाटसरुनाहि शीतल आसरा, एक आधार होतो.
झाडाखाली ,वडाची पानगळ चिक्कार होते म्हणून जैविक कचऱ्याचे खत ,कोट्यवधी
फळांचे अवशेष , मातीची धूप न होणे, पक्षांची विष्ठा [+ओलावा] ह्यामुळे
त्याखाली सकस जमीन बनते. त्यात गांडुळे खूप असतात. हि माती शेतात घालावी असे
आधुनिक कृषीशास्त्रहि सांगते हल्ली.
वडाचे अनेक औषधी गुणधर्मही आहेत. ते पुन्हा नंतर कधीतरी.

ऐतिहासिक वड - अक्षयवट-कुरुक्षेत्र , कलकत्ता , बंगळूरू, तामिळनाडूत , आणि गया
येथे आहेत. ह्यांचे वय काही शतके ते हजारो वर्षे इतके आहे असे मानले जाते.

भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेतत्रात रणांगणावरील ज्या वडाच्या झाडाखाली
भगवद्गीतेच्या अमर तत्त्वज्ञानाचे पान करवले ते ऐतिहासिक महत्त्व असलेले हे
वडाचे झाड पाच हजार वर्षापूर्वीचे आहे असे मानले जाते . हरियाणा राज्यातील
कुरुक्षेत्र येथील ज्योतीसार येथे असणारे हे झाड महाभारताच्या काळातील एकमेव
वृक्ष आहे असे मानले जाते .

.................Mr. Yogesh Madhukar Sawant.

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

५ टिप्पण्या:

Popular Articles

Heart (Photo credit: mozzercork ) नवरदेवाचे उखाणे... १) संसारातल्या संकटांची नाही पर्वा आता साथ आहे माझ्याबरोबर ......कांता !!!!! ...
मैत्री [Maitree - Friendship - Marathi Poem]
Image via Wikipedia मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय... गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस सोय म्हणून सहज असं तोडू नकोस.. र...
श्री स्वामी समर्थ [Shree Swami Samarth]
Shri Swami Samartha Maharaj, Akkalkot. (Photo credit: Wikipedia ) श्री स्वामी समर्थ आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतराजीत प्राचीन काळा...
Image by mundo resink via Flickr मलाही वाटते नाते असावे मलाही कुणि आपले असावे पण मग एकच गोष्ट माझ्या मनात येते.... आलो असेच आणि जाणारही अ...
पहिला पाऊस .. [The First Rain - Marathi Poem ]
Image via Wikipedia पहिला पाऊस पडतो तेंव्हा पहिला पाऊस पडतो तेंव्हा एकच काम करायचं... हातातली कामं टाकुन देउन पावसात जाऊन भिजायचं! आपल्या अ...
roses (Photo credit: Robert Couse-Baker ) रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं.. ...हातात हात धरुन...