सुखी आयुष्य जगण्यासाठी [For better life...]

English: Charak Monument in Yog Peeth Campus,F...
English: Charak Monument in Yog Peeth Campus,Father of Medicine & Surgery (Photo credit: Wikipedia)
शास्त्राने आणि विद्वानांनी सुखी आयुष्य जगण्यासाठी चिंता, दान, क्रोध, प्रेम इत्यादी विषयासंबंधी काही विशेष नीतीच्या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. या गोष्टींचे पालन आपण आपल्या आयुष्यात केले तर कधीही दुःख पदरी पडणार नाही.

चिंता केल्यामुळे फक्त नुकसान होत असते. अडचणी दूर होणार असतील तर जरूर चिंता करा; पण यामुळे अडचणी सुटत नाहीत क्लिष्ट होतात.

रागात आपण कठोरपणे वागून स्वत:चे किंवा इतरांचे नुकसान करून घेतो. आपण रागात असतो, तोपर्यत सामाजिक लाभांपासून वंचित असतो.

नम्रता हा सर्व सद्गुणांचा आधार आहे. नम्रतेमुळे दगडही मेणाप्रमाणे मऊ होतो. म्हणून नम्रतेने होणार्‍या कामासाठी उग्रतेचा वापर करू नये.

सर्वोत्तम दानशूर व्यक्ती तीच असते, जी आपल्या संपर्कात आलेल्या याचकाला असे सार्मथ्य देते की त्याला पुन्हा कधीच दानाची गरज भासत नाही.

दुसर्‍याच्या वाईट गोष्टी शोधून त्यावर चर्चा केल्यामुळे मन संकुचित राहते तसेच स्वभाव संदिग्ध होतो. असे झाल्यास हृदयात समरसता राहत नाही.


मित्रांना भेटताना नेहमीच त्यांचा मान राखा, त्याच्या अपरोक्ष त्यांची नेहमी प्रसंशा करा. आवश्यकता असेल, तर मित्राला यथाशक्ती मदत नक्की करा.


धीर ठेवणे कडू घोट पिण्याप्रमाणे आहे. पण त्याचे फळ मधुर असते. जो व्यक्ती धीर ठेवतो व कष्ट करण्यास घाबरत नाही, यश त्याच्या पायावर लोळण घेते.

- Mr. Yogesh Madhukar Sawant.

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा