मी मराठी

वेडीच आहे ती! [Vedi ahe ti - Marathi Kavita]

Cute little girl holding red heart - a 1910 Va...
Cute little girl holding red heart - a 1910 Valentine greeting (Photo credit: IronRodArt - Royce Bair ("Star Shooter"))
माझ्या जाण्याच्या दिवसाची वाट पाहतीये,
उरलेला प्रत्येक क्षणनक्षण माझ्यात जगायला,
वेडी कधी दिवसात तर कधी तासात वेळ मोजतीये,
वारंवार मला आठवण करून देतीये,
माहितीये मला ती तस का करतीये!

स्पष्टपणे न तीला काही बोलवेना न मला,डोळ्यांना मात्र कळतंय सार,नजरेतूनच चर्चा होते हल्ली आमच्यात!
तीच्या शिवाय जगण्याच्या विचाराने,थरकाप उडालाय माझ्या मनाचा,भावनांचाही कडेलोट झालाय केव्हाच,क्षण हा येणार हे दोघांनाही होते माहित,पण तरीही मन मात्र तयार होईना निघायला!

हातात हात घेउनी, नजरेला नजर भिडवूनी,घेताना तीचा निरोप,होणार माझे पानिपत!
पण,जाताना देईल तीला मी भरवसा,असलो जरी साता-समुद्रापार तरी राहील तुझ्या मनात,तुझ्या प्रेमाची सावली, जाणवेल मला तिथेही,आठवशील तू प्रत्येक श्वासाला,जाणवेल तुलाही अस्तित्व माझ,पापणी आपली लावताना!

तिथेच असेल मी तुझ्या मनात खोलवर रुजलेला,जाणीव…….
तू मनाने सोबत असल्याची पुरवून घेईल मी स्वतःला!
वेडे विश्वास ठेव!तुझ्या शिवायचा हा प्रत्येक क्षणही,फक्त तुझाच असेल,असेल तुझ्याच प्रेमात तो बहरलेला!
वाट पहा!लवकरच परतेन मी,तुझ्या मिठीतला स्वर्ग जगायला!!!

- ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

२ टिप्पण्या:

Popular Articles

Heart (Photo credit: mozzercork ) नवरदेवाचे उखाणे... १) संसारातल्या संकटांची नाही पर्वा आता साथ आहे माझ्याबरोबर ......कांता !!!!! ...
मैत्री [Maitree - Friendship - Marathi Poem]
Image via Wikipedia मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय... गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस सोय म्हणून सहज असं तोडू नकोस.. र...
श्री स्वामी समर्थ [Shree Swami Samarth]
Shri Swami Samartha Maharaj, Akkalkot. (Photo credit: Wikipedia ) श्री स्वामी समर्थ आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतराजीत प्राचीन काळा...
Image by mundo resink via Flickr मलाही वाटते नाते असावे मलाही कुणि आपले असावे पण मग एकच गोष्ट माझ्या मनात येते.... आलो असेच आणि जाणारही अ...
पहिला पाऊस .. [The First Rain - Marathi Poem ]
Image via Wikipedia पहिला पाऊस पडतो तेंव्हा पहिला पाऊस पडतो तेंव्हा एकच काम करायचं... हातातली कामं टाकुन देउन पावसात जाऊन भिजायचं! आपल्या अ...
roses (Photo credit: Robert Couse-Baker ) रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं.. ...हातात हात धरुन...