मी मराठी

आत्मविश्वासाला तडा गेल्यावर.. [after losing confidance]

pray
pray (Photo credit: zuki12)
आत्मविश्वासाला तडा गेल्यावर ,
कोणताच मार्ग उरत नाही..

सगळीकडे अंधार मग,
प्रकाश कुठेच रहात नाही..

डोळ्यातील पाणी सुकून जाते,
ओल्या जखमा मात्र काही केल्या सुकतच नाही ..

दुखं तेवढी सगळी सोबत असतात,
सुख मात्र थांबतच नाही..

अश्यावेळी समजवायला आपल्याला सगळे जण,
समजून मात्र कोणीच घेत नाही ..

वाटते मग देव तरी समजून घेईल आपल्याला,
कारण भावना आपल्या काही वाईट नाही ..

मग विटून जाते मन आपले देवाकडे प्रार्थना करून करून,
पण मन आपले त्यालाही कधी कध्धीच कळत नाही...

विसरून जावे म्हणतो आता सगळे ,
पण आठवण आल्याशिवाय काही रहात नाही ..

कारण माझीच माणसे आहेत ती सगळी ,
मी त्यांचा आणि ती माणसे माझी ,
या शिवाय माझ्या मनाला दुसरं काहीच कळत नाही ...

मोजकेच ठरलेले असते ना आयुष्य हे आपले
आणि त्यातही एकमेकांचे मन दुखावून काहीच उपयोग नाही ...

परिस्थिती मुळेच माणूस घडत किवा बिघडत असतो ,
त्यामुळेच निर्माण होत असते त्याची चांगली किंवा वाईट ओळख,
म्हणूनच आता असे वाटते कि जे काही घडत आहे त्यात कोणाचा काही दोष नाही ..

आपले दुखं आपणच सांभाळावे आता,
आणि दुसरयाचे दुखं हि घ्यावे वाटून आपण,
मिळाले सुख तर त्यातूनच मिळेल,
कारण दूसरा कोणता आता मार्गच नाही ..

संपून जाईल लवकरच सगळे काही,
ना सुख उरेल ना दुखं,

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

९ टिप्पण्या:

 1. KHUP SAMARPAK KAVITA AAHE...MANSACHYA AYUSHYAT ASE KSHAN KHUP VELA YETAT..PAN TARIHI TO PUNHA UBHA RAHTO NAVYA UMEDINE...AATMAVISHWAS GAMAVALYAVAR!

  उत्तर द्याहटवा
 2. agadi antarangatun aleli hi kavita ahe.
  kavita vachli tevha ase vatale ki he tar sare mazyach maniche bol ahet...
  pn,me ekach gost manin,,
  VAHUN,MODUN GELE SAGALE PN MODLA NAHI KANA..
  PATIVARTI HATH THEUN FAKT ATMAVISHWASANI LADH--LADH--LADH MANA....

  उत्तर द्याहटवा
 3. kharech khupda aushyat ase kshan yetat tyat apalyala purviche sagale visarun pudhe jave lagate

  उत्तर द्याहटवा
 4. kharach khup ase kshan jivnat yeatat jyaveli aplya javalcha vyakti aplyala vishwasala tada deto

  उत्तर द्याहटवा

Popular Articles

Heart (Photo credit: mozzercork ) नवरदेवाचे उखाणे... १) संसारातल्या संकटांची नाही पर्वा आता साथ आहे माझ्याबरोबर ......कांता !!!!! ...
मैत्री [Maitree - Friendship - Marathi Poem]
Image via Wikipedia मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय... गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस सोय म्हणून सहज असं तोडू नकोस.. र...
श्री स्वामी समर्थ [Shree Swami Samarth]
Shri Swami Samartha Maharaj, Akkalkot. (Photo credit: Wikipedia ) श्री स्वामी समर्थ आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतराजीत प्राचीन काळा...
Image by mundo resink via Flickr मलाही वाटते नाते असावे मलाही कुणि आपले असावे पण मग एकच गोष्ट माझ्या मनात येते.... आलो असेच आणि जाणारही अ...
पहिला पाऊस .. [The First Rain - Marathi Poem ]
Image via Wikipedia पहिला पाऊस पडतो तेंव्हा पहिला पाऊस पडतो तेंव्हा एकच काम करायचं... हातातली कामं टाकुन देउन पावसात जाऊन भिजायचं! आपल्या अ...
roses (Photo credit: Robert Couse-Baker ) रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं.. ...हातात हात धरुन...