औषधी गुणयुक्त सदाफुली [Medicinal use of Catharanthus roseus]

घरोघर आढळणारी पांढर्‍या फुलांची बाराही महिने फुलणारी सदाफुली किती औषधी गुणयुक्त आहे याची आपल्याला कल्पनाही नाही. सदाफुली आजच्या युगातील दोन भयंकर विकार- मधुमेह आणि लठ्ठपणा यावर आश्चर्यजनकरीत्या परिणामकारक असल्याचे आढळून आली आहे. रक्ताच्या कर्करोगातही ही फुले फार गुणकारी आहेत. सदाफुली हलकी, रुक्ष, कघाय, तिक्तरसयुक्त, विपाकात कटु व उष्णवीर्य समजली जाते.

ती वात आणि पित्ताचे शमन करते, मेंदूला शांती देते, प्रमेहाचा नाश करते, मधुमेह नियंत्रित करते. ती भारनाशक असून लठ्ठपणा दूर करते. सदाफुलीच्या मुळाच्या सालीत फेलोनिकराड, एक उडनशील तेल, दोन अल्कोहोल, दोन ग्यालकोसाइड, टॅनिन, करोटिनाइड, स्टिरॉल व उससोलीक अॅसिड असते. सदाफुलीच्या पाना-फुलांचा-मुळांचा उपयोग अनिद्रा आणि मानसिक उद्रेक दूरकरून शांती प्रदान करण्यासाठी केला जातो. विंचू आदि विषारी प्राणी किंवा किडे चावले असता सदाफुलीच्या सालीचा लेप लावल्यास किंवा पानांचा रस चोळल्यास फायदा होतो. सदाफुलीची जांभळ्या रंगाची फुले मधुमेहात रक्तशर्करा कमी करण्यासाठी गुणकारी आहेत.

एका कपात तीन ताजी फुले घेऊन त्यात अर्धा कप गरम पाणी टाकावं. पाच- सहा निनिटांनी फले काढून टाकावीत. एवढ्या वेळात फुलांचे गुणततत्त्व पाण्यात उतरतील. हे पाणी रोज सकाळी अनशापोटी 8-10 दिवस घेऊन रक्तशर्करा तपासून अगोदरची आणि नंतरची तुलना करावी. रक्तशर्करा घटली असल्यास 8-10 दिवसांनी पुन्हा हा प्रयोग करून पहावा. लठ्ठपणा दूर करण्यासाठी रोज सकाळी सदाफुलीची 3 पांढरी फुले खूप चाऊन चाऊन 8/10 दिवस खावीत. पुन्हा 8/10 दिवसानंतर हा प्रयोग करून पहावा.

Mr. Yogesh Madhukar Sawant.
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा