वाळवंट झालंय सगळ



कुठेही हिरवळ नाहीय
विसावा घ्यायचा म्हटलं
तर विसाव्याला काहीच नाहीय

थकतो हो मी ही कधीतरी
शोधून शोधून विसावा
बेकार जाते मेहनत
कुठेच नसतो गारवा

मी मात्र नेहमीच
वाट पाहतो चांदण्याची
मस्त जीवन असत
धास्ती नसते गारव्याची

मनाचं काय कुठेही डगमगत
जावूदे पण हिथे आहेच काय
वाळवंट झालंय सगळ
हिरवळ कुठेही नाही

उन्हाची मला सवयच नाही
काही भेटेल विसाव्याला
त्याची आता गरज नाही
एक झाड भेटलय
आता कशाची चिंता नाही...........

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा