मी मराठी

प्रेम तुझं खरं असेल तर

प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती..

भावना तुझ्या शुद्ध असतील, तर
तीही त्यात वाहून जाईल
मनावर अमृत सरी झेलत
तीही त्यात न्हाहून जाईल..

विचार तुझा नेक असेल, तर
तीही तुझा विचार करेल
हृदयाच्या तिच्या छेडून तारा
सप्तसूरांचा झंकार उरेल..

आधार तुझा बलवान असेल, तर
तीही तूझ्या कवेत वाहील
मग, कितीही वादळं आलीत
तरी प्रित तुमची तेवत राहील..

आशा सोडण्या इतकं
जिवन निराशवादी नाही रे
तिला न जिंकता यावं इतकं
मानवी हृदय पौलादी नाही रे..

पण, मित्रा जर ती नाहीचं आली
तरीही तू हार मानू नकोस
तू तर प्रामाणिकपणे खेळलास
आयुष्याला जुगार मानू नकोस..

शेवटी आयुष्य हे वाहतचं राहतं
थांबत नाही ते कोणासाठी
घे भरारी पुन्हा गगनी
नव्यानं कुणीचा तरी होण्यासाठी.

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

३ टिप्पण्या:

 1. प्रेमाच्या प्रवासात आजकाल सर्वाना सर्वच कसा र्ररेडीमेड
  हवे असते. आजकाल भावना ही रेडीमेड मिळतात कुणीतरी लिहिलेल्या.
  गेल्याच आठवड्यातील माझी प्रतीक्रींया होती की मी काही नशीबवान लोकांपैकी आहे ज्यांच्या साठी कोणीतरी झुरत आहे.

  व्यर्थ आहे सर्व हे मला ती प्रतिक्रिया लिहिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी समजले.
  कोणावर जीव ओवाळून टाकत असाल तर ....
  विचार करा
  कोणासाठी वेडे हौउ नका
  कारण तुमच्यासाठी कोणीही वेडे होत नसते.
  तुम्ही दुसऱ्याला समजून घ्या पण त्याने तुम्हाला समजून घ्यावे
  ही अपेक्षा कधीच करू नका.
  अपेक्षा ठेवाल तर अपेक्षा भंग देखील होऊ शकतो
  याची तयारी ठेवा.

  आज खऱ्या प्रेमाची अपेक्षा ठेवणारेच स्वतः खोटेपणाने वागतात.

  तुम्हाला वाटेल मी निराशावादी आहे
  नाही नक्कीच नाही
  मी स्वत खूप पोझिटिव्ह आहे
  व समोरच्याला सुद्धा तसेच बनवायला खूप
  धडपडलो.
  समोरचा तर बदलला नाहीच
  पण मीच निगेटिव्ह होतो की काय
  असे मला वाटू लागले.

  आता सर्व सोडून द्यावे असे वाटते.
  स्वताला कामामध्ये इतके गुंतवून घेतले आहे की
  कोणचा विचार करायलासुद्धा वेळ शिल्लक रहात नाही.

  उत्तर द्याहटवा
 2. Kaay he prem aste jychyawar karawe to nustach prem karto pna lagn karayla nahi mahnto. Jar Lagna karayche nahi tar nusate prem kaay karayche TE nibhawanychi takat hawi

  उत्तर द्याहटवा
 3. prem he aajkal fashion zale aahe.konihi yeto aani 2 diwas prem karto aani jato. yala prem n mhanta time pass mhantat...

  उत्तर द्याहटवा

Popular Articles

Heart (Photo credit: mozzercork ) नवरदेवाचे उखाणे... १) संसारातल्या संकटांची नाही पर्वा आता साथ आहे माझ्याबरोबर ......कांता !!!!! ...
मैत्री [Maitree - Friendship - Marathi Poem]
Image via Wikipedia मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय... गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस सोय म्हणून सहज असं तोडू नकोस.. र...
श्री स्वामी समर्थ [Shree Swami Samarth]
Shri Swami Samartha Maharaj, Akkalkot. (Photo credit: Wikipedia ) श्री स्वामी समर्थ आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतराजीत प्राचीन काळा...
Image by mundo resink via Flickr मलाही वाटते नाते असावे मलाही कुणि आपले असावे पण मग एकच गोष्ट माझ्या मनात येते.... आलो असेच आणि जाणारही अ...
पहिला पाऊस .. [The First Rain - Marathi Poem ]
Image via Wikipedia पहिला पाऊस पडतो तेंव्हा पहिला पाऊस पडतो तेंव्हा एकच काम करायचं... हातातली कामं टाकुन देउन पावसात जाऊन भिजायचं! आपल्या अ...
roses (Photo credit: Robert Couse-Baker ) रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं.. ...हातात हात धरुन...